23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » भाजपा शिवडी विधानसभा ई-श्रम कार्ड शिबीर
महाराष्ट्र

भाजपा शिवडी विधानसभा ई-श्रम कार्ड शिबीर

Bundelikhabar

श्रमिकांनी घेतला संधीचा फायदा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या जयंती निमित्त भाजपा वॉर्ड क्र. २०५चे अध्यक्ष गणेश शिंदे ह्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवडी विधानसभा युवती मोर्चा अध्यक्षा सोनिया जन्नेपल्ली, वॉर्ड क्र. २०५ महिला मोर्चाच्या अध्यक्षा जान्हवी राणे ह्यांच्या सहकार्याने आणि शिवडी विधानसभा युवती मोर्चा व दक्षिण मुंबई सरकारी योजना सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ६.०० या वेळात रामटेकडी, शिवनेरी टेकडी, शिवडी येथे ‘ई-श्रम कार्ड शिबीर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

ह्या कार्यक्रमाला शिवडी विधानसभा अध्यक्ष दिलीपभाई धुरी, शिवडी विधानसभा महामंत्री सचिन शेट्ये, शिवडी विधानसभा उपाध्यक्ष विश्वनाथ तोरस्कर, वॉर्ड क्र. २०६चे अध्यक्ष बाळासाहेब मुढे, शिवडी विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष गोविंद सिंग, वॉर्ड क्र. २०६चे महामंत्री दीपक आमकर, एकनाथ मोरे तसेच वॉर्ड क्र. २०५ मधील सर्व पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. रामटेकडी येथील स्थानिक रहिवाश्यांच्या सहकार्याने भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


Bundelikhabar

Related posts

लावारिस बैग मिलने से मची खलबली

Bundeli Khabar

२० ते २५ डिसेंबर दरम्यान “द्रोणागिरी” २२वा युवा महोत्सव रंगणार

Bundeli Khabar

“मृदगंध” पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!