31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » वळ गावचे उद्योगपती तथा समाजसेवक भानुदास भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत लसीकरण मोठ्या उस्तहात संपन्न
महाराष्ट्र

वळ गावचे उद्योगपती तथा समाजसेवक भानुदास भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत लसीकरण मोठ्या उस्तहात संपन्न

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मौजे वळ गावातील शेतकरी कुटुंबातील आदरणीय व्यक्तीमत्व स्व.भगवान शेठ भोईर व स्व.मधुकर शेठ भोईर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा घेऊन विकासक म्हणून उद्योजक क्षेत्रात उंच भरारी घेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उमटविला आहे.त्यामुळे श्री भानुदास मधुकर भोईर यांनी आपला वाढदिवस हा मोठा गाजावाजा न करता समाज सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे या उद्देशाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या गावातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करून सर्व ग्रामस्थांना दोन दिवस अगोदर शेलू माता ४०+ क्रिकेट संघ वळगाव यांच्या सौजन्याने आवाहन केले .की आपण जर लसीकरण केले नसेल तर मोफत लसीकरण मोहीम आपणासाठी स्व.भगवान शेठ भोईर ,स्व.मधुकर शेठ भोईर मंगळ कार्यालय वळ येथे बुधवार दि.२५/०८/२०२१ रोजी आयोजित केली आहे ती यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हा.मात्र ३०० डोस उपलब्ध आहेत अशी माहिती देऊन देखील प्रंचंड प्रतिसादामुळे ३५० नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण केले. त्यामुळे भानुदास मधुकर भोईर यांचा वाढदिवस हा एका यशस्वी उपक्रमाने साजरा झाला असे म्हणायला वावगे ठरू नये।


मलाही वाटले नव्हते की या लसीकरण मोहिमेला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल. माझा वाढदिवस एक निमित्त ठरला कारण लसीकरणाला आरोग्य केंद्रांवर मोठमोठ्या रांगा लागलेल्या असल्यामुळे बरेच जण लस न घेता घरी परत येत होते.तर काहींचा नंबर लागून सुद्धा लस संपली असे सांगितले जात होते. म्हणूनच आज ज्यांनी ज्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घेतली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असे श्री भानुदास भोईर यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले।


विद्यमान सरपंच राम भोईर व शेलू माता ४०+ क्रिकेट संघ वळगाव यांच्या पुढाकाराने हा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक श्री वरून सदाशिव पाटील,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री किशोर बळीराम पाटील,वळ ग्रामपंचायतीचे
सरपंच श्री. राम भोईर, उपसरपंच सौ. दीपिका राजेश भोईर,ग्रामपंचायत सदस्य मिथुन प्रभाकर पाटील,अमित रामदास भोईर,रामनाथ रामचंद्र पाटील, सौ.राजूबाई बाळकृष्ण नाईक, सौ.वनिता अनिल पाटील,सौ.प्रेषिता भागीरथ पाटील, सौ.योगिता नरेंद्र पाटील, कोपर गावचे माजी सरपंच श्री.जगदीश पाटील,वळ ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य,गावातील ग्रामस्थ,व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते।

Related posts

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संविधान प्रचारकांची कार्यशाळा संपन्न

Bundeli Khabar

सर्वांच्या प्रयत्नामुळे माझा मुलगा सुखरूप घरी पोहोचला- सोन्या पाटील

Bundeli Khabar

महापौर मुरलीधर मोहोल ने राज्य सरकार पर कोरोना नियमों में ढील को लेकर लगाया भेदभाव का आरोप

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!