36.9 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » गावातील जन्माला आलेल्या मुलींसाठी तुळशी रत्न कन्या योजने अंतर्गत फिक्स डिपाँझिटचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वाटप
महाराष्ट्र

गावातील जन्माला आलेल्या मुलींसाठी तुळशी रत्न कन्या योजने अंतर्गत फिक्स डिपाँझिटचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वाटप

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका कुंदन तुळशीराम पाटील यांनी तालुक्यातील दापोडे गावात जन्माला आलेल्या मुलींसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.जन्मास आलेल्या नवजात मुलीस कुंदन पाटील यांनी आपल्या दिवंगत वडील तुळशिराम पाटील यांच्या नावे दापोडे गाव मर्यादीत सुरु केलेली तुलसी कन्या रत्न योजना जाहीर केली असुन या योजनेअंतर्गत त्या मुलीच्या नावे २१ हजार रुपये त्या मुलीच्या नावे बैंकेत फिक्स डिपॉजीट केले जातात व मुलगी 18 वर्षांची झाली की 1 लाख 10 हजार रुपये मिळतील आशा अनोखा उपक्रम कुंदन पाटील यांनी आपल्या गावात सुरू केला आहे।


यावर्षी देखील दापोडे गावात तीन मुलींचा जन्म झालाय या तिन्ही मुलींना कुंदन पाटील यांच्या तुळशी कन्या रत्न योजना अंतर्गत 21 हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट मुंबई महानगरपालिका महापौर दालनात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या तिन्ही नवजात मुलींचे फिक्स डिपॉझिट करण्यात आले आहे.कुंदन पाटील यांनी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ या मुलींना मिळणार आहे तसेच पाटील यांच्या मते जर आमदार खासदार समाजसेवक कार्यकर्ते,नगरसेवक यांनी जर आपल्या गावात अशा प्रकारची योजना राबवली तर याचा बऱ्यापैकी लाभ मुलींना मिळू शकतो अशी प्रतिक्रिया कुंदन पाटील यांनी दिली आहे.यावेळी आमदार रईस शेख,अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू,शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील,तालुका सचिव दीपक पाटील, सचिव राजेंद्र काबाडी,सचिव जय भगत, जि.प.गट सचिव संदीप पाटील, शेखर मामा फर्मान,शाखा प्रमुख अनंता भामरे,पत्रकार राजेंद्र पाटील उपस्थित होते.महापौर किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या की, ठाणे जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील यांनी आतापर्यंत अकरा मुलींना या योजनेअंतर्गत पुरस्कृत केले असून समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी चांगला उपक्रम राबविला असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच गरीब कुटुंबातील मुलींना एक चांगला आधार या योजनेद्वारा मिळणार असल्याचे महापौरांनी सांगितले.भावी पाटील,कायरा पाटील, दिव्यांशी पाटील या तीन मुलींच्या पालकांनी हे सदर प्रमाणपत्र महापौरांचे हस्ते स्वीकारले.।

Related posts

अनिवार्य टीकाकरण और जबरदस्ती के विरोध में आजाद मैदान में भारी संख्या में लोगों का विरोध प्रदर्शन

Bundeli Khabar

सोनू सूद की इंटरनेशनल ग्लोरी अवार्ड शो में विशेष उपस्थिति

Bundeli Khabar

जन आशीर्वाद यात्रा आयोजित करने वाले भाजपा पदाधिकारियों के खिलाफ मामला दर्ज

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!