24.4 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20221121 WA0002
महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संविधान प्रचारकांची कार्यशाळा संपन्न

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई शहरात येत्या संविधान दिनानिमित्ताने संविधान जागर अभियानाची सुरुवात होणार असून त्याकरिता ‘संविधान प्रचारक’ या भूमिकेत काम करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांची कार्यशाळा रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झाली.

येत्या संविधान दिनापासून ते आगामी प्रजासत्ताक दिनापर्यंत दोन महिने मुंबई शहरात ठिकठिकाणी संविधान जागृती कार्यक्रम करण्याचे अभियान ‘यशवंतराव चव्हाण लीगल फोरम’ मार्फत राबविण्यात येणार आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून संविधानाविषयी जनजागृती करण्याचे काम मुंबई शहर परिसरात यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रशिक्षित संविधान प्रचारकांचा एक गट काम करेल. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे या संविधान प्रचारकांची कार्यशाळा रविवारी संपन्न झाली. कार्यशाळेदरम्यान ही माहिती यशवंतराव चव्हाण सेंटरचे विधी सल्लागार ॲड. जयमंगल धनराज यांनी दिली. तसेच या उपक्रमावर सेंटरच्या कार्याध्यक्षा माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा विशेष भर आहे, हेदेखील धनराज यांनी नमूद केले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या संविधान प्रचारकांना संविधानाची माहिती व महती लोकांना कशी सांगावी, याविषयीचे मार्गदर्शन विविध तज्ज्ञांनी केले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांच्या आयोजनाच्या दृष्टीने कार्यशाळेत चर्चा झाली. देशातील वातावरण अधिक संविधानशील करण्याच्या दृष्टीने जनमानसात याविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने हे अभियान यशस्वी व्हायला हवे, असे ॲड. धनराज आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले. तसेच त्याकरिता मुंबई शहरात आपण सर्वांनी संविधानाचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत व त्याकरिता संविधानप्रेमी नागरिकांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करायचे आहे, असे आवाहनही कार्यशाळेच्या समारोपात जयमंगल धनराज यांनी केले. या कार्यशाळेत अनेक वकील व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन या अभियानात स्वयंस्फूर्तीने संविधान प्रचारक म्हणून या राष्ट्रीय कार्यास यशस्वी करण्याचा मानस व्यक्त केला. लवकरच यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येईल असे ॲड. धनराज यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मनीषा खिल्लारे, सूरज भोईर, अनिल चिंदरकर यांनी परिश्रम घेतले.


Bundelikhabar

Related posts

MNS प्रमुख राज ठाकरे हुए कोरोना संक्रमित, मां की भी रिपोर्ट आई पॉजिटिव, घर में चल रहा इलाज

Bundeli Khabar

नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका, बंगल्यातील बेकायदा बांधकाम दोन आठवड्यात पाडण्याचे निर्दे

Bundeli Khabar

इंजिनीयर मनोज सखाराम माडगुळकर यांच्या विरोधात, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार

Bundeli Khabar
error: Content is protected !!