किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास फक्त डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही.उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.आजच्या करोना काळात वैद्यकीय सेवेत विविध पदावर काम करणाऱ्या प्रत्येकाला महत्त्व प्राप्त झाले आहे, यापुढेही या क्षेत्रात मनुष्यबळाची गरज लागणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे असे मत जी.एम. एस पॅरामेडिकल कॉलेज चे प्राचार्य राज पंडीत यांनी विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल अभ्यासक्रमासंदर्भात माहिती मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले.
या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक जी. एम. एस पॅरामेडिकल कॉलेज चे प्राचार्य राज पंडीत,मनोज जॅकॉब, जॉर्ज वरघीस,डॉ.राखी दिघे,डॉ. सुमेध देसाई, पदमीनी भोईर, कानल रावल , प्रेमलक्ष चॅरिटेबल ट्रस्ट कार्याध्यक्ष दिपेश गावंड, मुख्याध्यापिका मनप्रीत कौर,आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यादरम्यान प्रेमा लक्ष्मण विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला।
दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आपले भविष्य घडवण्यासाठी ” प्रेमलक्ष चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्रेमा लक्ष्मण विद्यालय पेणकरपाडा व जी. एम. एस पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रेमा लक्ष्मण विद्यालयात पेणकरपाडा येथे ‘मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर मार्गदर्शन शिबीराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपवैद्यकीय अभ्यासाकरीता प्रवेश घ्यावा व त्यातील करीअर च्या संधीचा चांगल्या पध्दतीने उपयोग करुन घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.शिबीराअंती विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून या मार्गदर्शन शिबिराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले..!
चौकट ;-
” आपल्या विभागातील मुलांनी आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या व्यतिरिक्त नवीन करिअर अभ्यासक्रमाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करून, त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात सक्षम होण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांची विद्यार्थ्यांना गरज आहे असे प्रेम लक्ष चॅरिटेबल विद्यमान कार्याध्यक्ष दिपेश गावंड यांनी सांगितले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.”


