किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : महाराष्ट्रातील एसटी महामंडळातील कर्मचारी तुटपुंजे वेतन त्यासोबतच एसटी महामंडळाचा शासनामध्ये विलीनीकरण करावा या मागणी करताच आंदोलनकर्त्या कामगारांना एस टी आगारात आंदोलन करण्यासाठी मंडप उभारण्यास एस टी आगार व्यवस्थापक, पालिका व पोलीस प्रशासन परवानगी देत नसल्याची माहिती मिळताच भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी एस टी आगारात धाव घेत कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा देत पालिका ,पोलीस व एस टी प्रशासना सोबत बोलून आंदोलन स्थळी मंडप उभारण्यास परवानगी ०८.११.२०२१ रोजी मिळवून दिली. तसेच आज एसटी कर्मचाऱ्यांना बेटून राज्य सरकार ला निवेदन केले की लवकर एसटी कर्मचाऱ्यांना मागणी पूर्ण करावे या मागणीसाठी गटनेता हनुमान चौधरी, जिल्हा महासचिव राजू गाजेंगी, दक्षिण भारतीय आघाडी कोकण ठाणे संयोजक कोंका मल्लेशम, उपाध्यक्ष अविनाश सिकची विजय धुळे, शत्वशीला जाधव, युवा अध्यक्ष राजू चौघुले, महिला मोर्चा अध्यक्ष ममता परमानी, अनुसूचित जाती अध्यक्ष मधुकर जगताप, उत्तर भारतीय अध्यक्ष प्रवीण मिश्रा, दक्षिण भारतीय मोर्चा अध्यक्ष मोहन कोंडा, प्रवक्ता प्रितेश ठक्कर, मोहन बल्लेवार प्रसिद्धी प्रमुख पी डी यादव, सोशल मीडिया संयोजक राम बुरा, मंडळ अध्यक्ष मारुती देशमुख, डिंपल व्यास, कृष्णा हलवाई, अनिल चिंतल, अशोक शर्मा, शशिकला तिवारी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. परत एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष एम शेट्टी व आमदार महेश चौघुले यांच्या सहकार्याने मिळवून दिल्याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी भाजपा भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष एम शेट्टी व आमदार महेश चौघुले चे आभार व्यक्त केले.
Home » भिवंडीत एसटी बस चालक व वाहक यांचा संप सुरु
previous post

