किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : तालुक्यातील कोंढले व उसर ग्रामपंचायत हद्दीतील असलेली प्राज हायप्युरिटी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी (ता.२४) रोजी स्वराज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने सभा घेण्यात आली. यावेळी नवीन युनिट कमीटी तयार करून फलकाचे अनावरण करण्यात आले.
कामगार व उद्योजक हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचे शोषण न करता कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सहकार्य करावे.असे स्वराज्य माथाडी कामगार संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांनी बोलतांना सांगीतले।
यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले.यामध्ये कामगारांना कायम स्वरूपी कामावर रूजू करून घ्यावे,कामगारांना भरीव पगारवाढ करण्यात यावी, वर्षाच्या सुट्ट्या भरपगारी मिळाव्यात, मिळणारा वर्षाचा बोनस यावर सकारात्मक चर्चा करावी, मागील पाच वर्षाचा एरियस मिळावा, कामगारांचा विमा चालु करणे, युनियन कमिटीत असलेल्या कामगाराला मोबाईल वापरास परवानगी असावी, ओव्हर टाईमसाठी कामगारावर जबरदस्ती करू नये आदी मागण्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली।
या प्रसंगी भाजपा युवामोर्चाचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर पाटील, स्वराज्य माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, सचिव भरत काळे, वासुदेव पाटील, सरचिटणीस रोहन पाटील, खजिनदार पंढरीनाथ घोडविंदे,
युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल साळवी,भाजपा महीला आघाडी जिल्हा सरचिटणीस मेघना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अर्चना भोईर,भाजपा महीला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले, प्रभारी प्रशांत संखे, उपाध्यक्ष विजय पाटील, उत्तम चौधरी, कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद विशे,खजिनदार सचिन चौधरी, प्रमुख सल्लागार वैभव चौधरी, भाजपा विभाग प्रमुख कल्पेश पाटील आदी उपस्थित होते।