मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेचा प्रारंभ चंदीगड विद्यापीठाच्या प्रांगणात झाला आहे. नॅशनल कॅडेट आणि सब ज्युनिअर ज्युडो चाम्पियनशीप २०२१-२२ साठी या स्पर्धा असून देशभरातून खेळाडू यात सहभागी झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चिन्नी, संघटनेचे अध्यक्ष खासदार प्रताप सिंग बाजवा, विद्यापीठाचे कुलगुरु एस. सतनाम सिद्धू तसेच संघटनेचे सरचिटणीस वेंकट नमिशेट्टी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

