23.4 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20211230 WA0014
महाराष्ट्र

1/अ व 7/ह प्रभागात अनधिकृत चाळीचे व आर.सी.सी फुटिंगचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार
कल्याण :- महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त अनंत कदम यांचे मार्गदर्शनाखाली 1/अ प्रभागातील सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी मोहना येथील रहिवास नसलेल्या दहा चाळींच्या खोल्यांचे बांधकाम व चार जोते निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच केली. सदर कारवाई अधिक्षक स्वाती गरुड, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व 1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचप्रमाणे विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 7/ह प्रभागाचे सहा.आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम, जूनी डोंबिवली येथील सुरेश भुवन इमारतीच्या बाजूला , भारत माता शाळेच्या मागे बांधकाम धारक सुरेश गायकवाड यांचे राज्य शासनाच्या भूखंडावरील आर.सी.सी फुटिंग आणि कॉलमचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी, 1 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.


Bundelikhabar

Related posts

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क प्रभाग क्षेत्रातील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

राम सेतु समुद्रात बुडाला

Bundeli Khabar

एफडब्लू्आईसीई ने जताया डॉक्यूमेंट्री काली के पोस्टर का विरोध

Bundeli Khabar
error: Content is protected !!