40.2 C
Madhya Pradesh
May 16, 2024
Bundeli Khabar
Home » आपले मानवाधिकार फाउंडेशन ने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणखी सक्रिय व्हावे: समाजसेवक अण्णा हजारे
महाराष्ट्र

आपले मानवाधिकार फाउंडेशन ने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणखी सक्रिय व्हावे: समाजसेवक अण्णा हजारे

प्रतिनिधी/डॉ.दिपेश पष्टे
अहमदनगर : माहिती अधिकार चे जनक अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी मधील समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले मानवाधिकार फाउंडेशन च्या ‘भ्रष्टाचार मुक्त अभियान’ चे कार्य पाहून प्रशंसा केली आणि सामाजिक कार्यासाठी आमचा पाठिंबा तसेच सहकार्य असेल असे आश्वासन दिले. यावेळी आपले मानवाधिकार फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य प्रमुख नानासाहेब पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते।


महाराष्ट्रातील भ्रष्टाचार हा शिगेला पोहोचला असून सामान्य जनता त्यामध्ये होरपळले जात आहे. याबाबत कोणतीही संघटना, संस्था अथवा शासन ठोस पावले उचलत नाही. म्हणून आपण जनजागृती करून तसेच काही नियमावली तयार करून या भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो, अशी संकल्पना फाऊंडेशनचे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांनी फाउंडेशन च्या सर्व पदाधिकारी यांच्या मनात रुजवली. अखेर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने व हिमतीने याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले आणि शासनाकडे काही शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना नियम लागू करण्यासाठी नियमावली तयार केली व त्याची मागणी करून सर्व जिल्हा स्तरावर चौकशी करावी असा आग्रह धरण्यात आला. महावितरण संदर्भात जनतेवर होणारे अन्याय, कोरोना काळात हॉस्पिटल कडून अवाजवी येणारे बिल, फायनान्स कंपन्यांची अरेरावी अशा अनेक विषयांवर आपले मानवाधिकार फाउंडेशन ने आवाज उठवून सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे कोरोना जनजागृती, रक्तदान, शिबीर, आरोग्य शिबीर, धान्य वाटप,कपडे वाटप, विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर तसेच इतर समाजपयोगी कार्य केले जात आहे।


आपले मानवाधिकार फाउंडेशन चे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व प्रशिक्षण वसई(पालघर) येथे होत असून त्यासंदर्भातील चर्चा राज्य प्रमुख नानासाहेब पाटील यांच्या माध्यमातून राळेगणसिद्धी येथील हजारे यांच्या राहत्या घरी करण्यात आली. “आपले मानवाधिकार फाउंडेशन खरोखरच कौतुकास्पद कार्य करत आहे. आजच्या काळामध्ये ‘भ्रष्टाचार मुक्त अभियान’ सारखे कार्य होणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी एक चळवळ सुरू करणे गरजेचे आहे।

असेच कार्य आपल्या फाउंडेशन मार्फत चालू ठेऊन सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, त्याकरिता आम्ही नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य करू” असे समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील खेडोपाड्यात आजतागायत गावठी, हातभट्टी दारू विक्री सर्रासपणे केली जात आहे. यामुळे भरपूर कुटुंबांची वाताहत होत असून अनेकांची संसारे उध्वस्त होत आहेत. आपले मानवाधिकार फाउंडेशन मार्फत गावोगावी फिरून ‘दारू बंदी’ करिता जनजागृती करावी तसेच कमिटी नेमून शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या हक्क आणि अधिकार मागणीकरिता आम्ही नेहमी पाठीशी आहोत तसेच अधिवेशन व प्रशिक्षण साठी उपस्थित राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे।


आपले मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य प्रमुख नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही चर्चा करण्यात आली होती यावेळी फाउंडेशन चे ईतर पदाधिकारी उपस्थित होते।

Related posts

ठाणे मनपा ने अब तक कुल 10 लाख 614 उच्च कोरोना टीकाकरण के महत्वपूर्ण चरण को किया पूरा

Bundeli Khabar

प्रि. महाडिक उद्यानाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन

Bundeli Khabar

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक येथील ५०० आशा सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून् सन्मान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!