37.2 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक येथील ५०० आशा सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून् सन्मान
महाराष्ट्र

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक येथील ५०० आशा सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून् सन्मान

भिवंडी : संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून नावाजलेली सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा ,सांस्कृतिक, आरोग्य व आदी कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था म्हणजे समाज कल्याण न्यास होय, या संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबविले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दि. २१/०१/२०२२ रोजी नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात ज्या आशा सेविकांनी काम केले त्या आशा सेविकांचा कोरोना योद्धा २०२१ म्हणून
सन्मान पत्र , साडी व हळदी कुंकू करून मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉक्टर श्री सोन्या काशिनाथ पाटील, महाराष्ट्राचे लाडके गायक ,बिग बॉस दादुस उर्फ श्री.संतोष चौधरी, समाज कल्याण न्यासच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.तनुजा ताई घोलप, सौ.जयश्री गोडसे, सौ.तपस्वी पाटील,श्री.अनील घोलाप, श्री.तानाजीअरोटे, श्री.विक्रम ढिकले तसेच ढेकुळ वेब सिरीज टीम, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य व शशिकला महिला सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था नाशिक चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य व शशिकला महिला सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके गायक तथा बिग बॉस फेम श्री संतोष (दादुस) चौधरी यांची खास उपस्थिती राहिल्यामुळे सर्व आशा सेविका, महिला वर्ग महिला कामगार वर्ग , शालेय , कॉलेज विद्यार्थिनी यांनी ही सहभाग नोंदवून महाराष्ट्राचे लाडके गायक श्री संतोष चौधरी यांच्यासोबत गान्यासह नृत्याचा आनंद घेतला मात्र कोरानाचे नियम पाळून सोशल डिस्ट्रक्शनचे पालन करुन ३०/४० महिलांचा ग्रुप करून सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले असे आयोजक डॉक्टर श्री.सोन्या काशिनाथ पाटील व सौ तनुजा (घोलप) भोईर यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले, हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य व शशिकला महिला सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था नाशिक चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली…

Related posts

चिपळूण पूरग्रस्तांच्या घराघरात पोहचून जिजाऊचं मदतकार्य.

Bundeli Khabar

ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका – ओबीसी नेते हरिश्चंद्र भोईर

Bundeli Khabar

एड. जितेंद्र शर्मा ‘महाराष्ट्र मित्र पुरस्कार’ से सम्मानित

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!