21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे यांची महानगरपालिकेस भेट
महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे यांची महानगरपालिकेस भेट

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
पिंपरी : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांचे स्वागत केले।


यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, नगरसदस्य एडवोकेट सचिन भोसले. नगरसदस्या मीनल यादव, अश्विनी वाघमारे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप आदी अधिकारी उपस्थित होते।


डॉ. निलम गो-हे यांनी कोरोना मारामारीच्या काळात महानगरपालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीची आयुक्त राजेश पाटील यांचेकडून माहिती घेतली. तसेच कोरोना कालावधीत शासनाने जाहीर केलेल्या माथाडी कामगार, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, एकल महिला, निराधार मुले यांचेकरीता असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेने केलेल्या कामकाजाचा देखील त्यांनी आढावा घेतला. महानगरपालिकेने कोरोना काळात केलेल्या कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले।


Bundelikhabar

Related posts

लाँग मार्चच्या पूर्वतयारीसाठी इंटक कार्यालयात महत्वाची बैठक

Bundeli Khabar

मंदिरासाठी दोन लाख रुपये निधि देणारा दानशूर दाता ज्ञानेश्वर पाटील

Bundeli Khabar

सरपंच सौ.वैशाली थळे, यांच्या नेतृत्वाखाली, कशेळी शिवसेना महिला आघाडीची विशेष सभा संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!