26.4 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211127 WA0003
महाराष्ट्र

सरपंच सौ.वैशाली थळे, यांच्या नेतृत्वाखाली, कशेळी शिवसेना महिला आघाडीची विशेष सभा संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : २६/११/२१ चा दिवस म्हणजे संविधान दिवस होय या दिवसाचे औचित्य साधुन कशेळी गावच्या सरपंच सौ.वैशाली देवानंद थळे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच कशेळी गाव येथील महिलांसाठी विशेष लक्षणीय ठरला. असे म्हणायला वावगे ठरू नये कारण याच दिवशी “शिवसेना महिला आघाडी “ची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण चे उप जिल्हा प्रमुख श्री .देवानंदजी थळे , ठाणे जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ.कला ताई शिंदे, उप जिल्हा संघटक सौ कविता ताई भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कशेळी गावातील अनेक महिलांनी या मध्ये सक्रिय सहभाग घेतला. महिला सक्षमी साठी , स्वयं रोजगार, महिला सुरक्षा अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.तसेच अनेक महिलांची पद नियुक्ती सुद्धा करण्यात आली. या कार्यक्रमात कला ताई शिंदे, कविताताई भगत आणि देवानंद थळे यांनी महिलांना योग्य असे मार्गदर्शन केले.
येणाऱ्या काळात देवानंद जी थळे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षा ऍप ” लवकरच अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही आश्वासन यावेली महिलांना दिले.


Bundelikhabar

Related posts

विधायक जी का निरीक्षण

Bundeli Khabar

ठाण्यात होणार “नारी तू नारायणी रत्न पुरस्कार आणि सौंदर्य स्पर्धा”

Bundeli Khabar

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्या वतीने हजार गरीब गरजु मुलांना पितृपक्ष निमित्त महाप्रसाद

Bundeli Khabar
error: Content is protected !!