30.2 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20210822 WA00612
महाराष्ट्र

वडवली-अटाळीत रक्षाबंधन उत्साहात साजरा

Bundelikhabar

सुनिल जगताप/महाराष्ट्र
आंबिवली : नवनाथ बाळाराम पाटील यांच्या जनहित कक्षात आज रक्षाबंधन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. प्रभागांतील शेकडो महिलांनी आज दादांच्या जनसंपर्क कार्यालयात येवून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला .रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते।

हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते,माझ्यासाठी रक्षाबंधन म्हणजे माझ्या सर्व भगिनींनी माझ्यावर ठेवलेला विश्वास. त्या विश्वासाला मी कायम स्वरुपी बांधलेलो आहे।
तुमची सुरक्षा, तुमची प्रगती हेच माझं कर्तव्य आहे आणि हीच आजच्या दिवशी नव्हे तर प्रत्येक दिवशी माझी तुम्हाला भेट आहे।


तुमच्या भाऊरायाला तुमचा आशीर्वाद द्या. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभा असेन हे मी तुम्हाला वचन देतो। रक्षाबंधनाच्या सर्व भगिनींना व जे स्वतःच्या बहिणीसोबत इतरांच्या बहिणींच्याही रक्षणाची जबाबदारी घेतात त्या सर्व बंधूंना खूप साऱ्या शुभेच्छा

IMG 20210822 WA00613

Bundelikhabar

Related posts

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संविधान प्रचारकांची कार्यशाळा संपन्न

Bundeli Khabar

फसल संरक्षण में मददगार है कृषि रसायन

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्यात झिका अलर्ट

Bundeli Khabar
error: Content is protected !!