35.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २१ मार्च पासून मुंबईत
महाराष्ट्र

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २१ मार्च पासून मुंबईत

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत १२ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा महोत्सव स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन २१ मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित राहतील. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल तसेच प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले हेही यावेळी उपस्थित राहतील.

या महोत्सवात जागतिक पातळीवरील ३०, भारतीय ५ आणि मराठी ५ असे एकूण ४० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना भारतीय चित्रपटांसोबत फ्रांस, इंडोनेशिया, जर्मनी, इस्त्राइल, रशिया, हंगेरी, सौदी अरेबिया, इटली, ब्रिटन, रोमानिया, ब्राझिल, स्पेन अर्थातच महोत्सवामध्ये ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टीव्ह, इंडियन सिनेमा, कंट्री फोकस आणि मराठी सिनेमा इत्यादी प्रकारचे सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२२०२८५९८ (सकाळी ११ ते सायं ६ वाजेपर्यंत) संपर्क साधावा अथवा ऑनलाईन नोंदणीसाठी www.yiffonline.com संकेतस्थळाला भेट द्या. कोरोनाच्या कालखंडानंतर मुंबईत होणारा एकमेव यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे.

Related posts

परवडणारे वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे – राज्यपाल

Bundeli Khabar

ठाणे में मिले कोरोना संक्रमित ३७ मरीज, डिस्चार्ज हुए ४७ मरीज

Bundeli Khabar

केडीएमसी क्षेत्र में डिस्चार्ज हुए ४७ मरीज, मिले ४८ नए मरीज

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!