39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » नकळत रंगली स्पर्धा-समीर मार्कंडे, स्वप्नील शेजवळ,पुनम शिंदे छायाचित्र स्पर्धेतील विजेते
Uncategorizedमहाराष्ट्र

नकळत रंगली स्पर्धा-समीर मार्कंडे, स्वप्नील शेजवळ,पुनम शिंदे छायाचित्र स्पर्धेतील विजेते

संभाजी मोरे/महाराष्ट्र
ठाणे : छायाचित्रकार हा दिवसाचे 24 तास कार्यरत असतो. कधी कोणती घटना घडली तर तो तातडीने तिथे पोहचून छायाचित्र काढतो. 1 हजार शब्द, वक्त्याच्या व्याख्यानापेक्षा एक छायाचित्र प्रभावी ठरत असते. त्यामुळेच की काय प्रत्येक छायाचित्रकार आपल्यापरीने बेस्ट वर्क करण्याचा प्रयत्न करतो. या वर्षाचे 365 दिवस कार्यरत असणार्‍या छायाचित्रकारांचा जागतिक पत्रकारदिनी सन्मान करण्यासाठी आम्ही छायाचित्रे मागवली आणि छायाचित्रांचा पाऊस पडला. आपोआप स्पर्धा झाली. या स्पर्धेतील विजेते अनुकमे विजेते समीर मार्कंडे (मुंबई), स्वप्नील शेजवळ (कल्याण) आणि पुनम शिंदे(ठाणे) ठरले आहेत।


जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त दै. जनादेशने फोटोग्राफर मंडळींची छायाचित्रे प्रसिध्द करण्याचा संकल्प सोडला. पण अवघ्या चार दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून 66 चित्रे आली आणि नकळत एक स्पर्धा तयार झाली. यातून 12 चित्रांना फायनल राऊंड पार पडला. अखेर स्पर्धा झाली. यात 1) चित्रांगण घोलप(जव्हार), 2) सुधीर नाझरे(मुरुड-जंजिरा) ही 2 विशेष चित्रे नजरेस भरली, तर अनुक्रमे 1) समीर मार्कंडे, ठाणे 2) स्वप्नील शेजवळ, कल्याण 3) पुनम शिंदे, ठाणे अशा तिघांनी ही स्पर्धा जिंकली।

Related posts

सपा विधायक अबू आजमी के खिलाफ केस दर्ज, तलवार से केक काटने और कोरोना नियम तोड़ने का आरोप

Bundeli Khabar

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन

Bundeli Khabar

वरिष्ठ फिल्म पत्रकार काली दास पाण्डेय झारखंड में सम्मानित

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!