28.5 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210813 WA0006
महाराष्ट्र

अनाथ मुलांच्या आरक्षणामध्ये बदल – अधिवक्ता यशोमती ठाकूर

Bundelikhabar

आर्चिस पाटील/महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अधिवक्ता यशोमती ठाकूर यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की अनाथ मुलांच्या आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर मध्ये काही त्रुटी आढळल्या मुळे महत्त्वाचा बदल यामध्ये करण्यात आला आहे. अनाथ मुलांच्या आरक्षणामध्ये तीन प्रकारचे गट तयार करण्यात आले आहेत. अ गट- संपूर्ण अनाथ या गटातील मुले असतील।


ब गट- ज्यांचे नातेवाईक आहेत पण अशी मुले अनाथाश्रमात राहतात.
क गट- ज्यांचे नातेवाईक आहेत आणि अनाथ आश्रम मधून आपले संगोपन पूर्ण केलेली मुले।या पद्धतीत काहीसा बदल आरक्षणामध्ये करण्यात आला असून मंत्रिमंडळातून ठराव मंजूर करण्यात आला आहे।


या बदलासोबत अजून एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. ज्या महिला इतर शहरांमध्ये काम करतात अशा महिलांसाठी हॉस्टेल स्वरूपात राहण्यासाठी रूमचे भाडे देण्यात येईल. हा करार कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्ष या पद्धतीत होईल. ज्या महिलांना पन्नास हजारापेक्षा कमी पगार असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्याबरोबरच अविवाहित महिलांना शेअरिंग रूमचे भाडे मिळेल आणि ज्या महिलांना एक अपत्य आहे, जे मुलगा पाच वर्ष व मुलगी अठरा वर्ष अशा स्वरूपात आहेत. त्या अपत्यांना आई सोबत राहण्याची मुभा देण्यात येईल. असेही यशोमती ठाकूर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या.।


Bundelikhabar

Related posts

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Bundeli Khabar

डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी बजावले आपले कर्तव्य कोल्हापूर मधिल पूरग्रस्तांना दिला मदतीचा दिलासा

Bundeli Khabar

“हुनर” तर्फे महिलांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!