38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » कमांडर मनीलाल शिंपी यांनी आपल्या समाजाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले- कमलाकर कापडणे
महाराष्ट्र

कमांडर मनीलाल शिंपी यांनी आपल्या समाजाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले- कमलाकर कापडणे

संपादक किशोर पाटील यांच्या सहकार्यामुळे आपण हे काम करू शकलो – मनिलाल शिंपी
साक्री येथे गरजुना शिलाई मशीनचे वाटप !

साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील समाजसेवेचा वसा घेणाऱ्या समाजसेविका श्रीमती जोशीला पगारिया यांच्या निवासस्थानी परिवर्धे तालुका शहादा येथील,डॉ.श्री.मनिलाल रतीलाल शिंपी ,आर एस पी युनिट कमांडर कल्याण ठाणे यांच्या माध्यमातून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, निजामपूर येथील ज्येष्ठ समाज मार्गदर्शक श्री. कमलाकर (आप्पा) कापडणे, मध्यवर्ती संस्थेचे सहसचिव श्री शरद जगताप, यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच अपघातात मृत्यू झालेल्या कै.निलेश सदाशिव जाधव यांच्या पश्चात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे त्यांच्या पत्नी श्रीमती सोनी उर्फ भावना जाधव यांना, व भाडणे गाव तालुका साक्री येथील अत्यंत हलाखीची परिस्थिती तुन कुटुंब जोपासणारे श्री अरुण बंशीलाल बोरसे यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी भगवान बोरसे, अनिल निकम सुनील निकम, शहादा येथील समाज कार्यकर्ते लक्ष्मीकांत खैरनार, प्रकाश चित्ते, भरत सोनवणे व आदी मान्यवर मंडली उपस्थित होते.डॉ.श्री.मनिलाल रतीलाल शिंपी हे आमच्या समाजातील एक रत्न आहे कारण त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत पेपर विक्री व पाव विक्री करून शिक्षण घेऊन अतिशय जिद्द व चिकाटीने आपल्या कर्तृत्वाची व कार्याची थाप आर.एस.पी.अधिकारी युनिट कल्याण ठाणे, कमांडर,महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन चे डायरेक्टर तसेच महाराष्ट्र राज्याचे राजदुत (ब्रँड। अँबेसिडर) डॉ.श्री.मनिलाल रतीलाल शिंपी यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यापर्यंत पोहोचवली त्यामुळे आमच्या शिंपी समाजाचे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचविले व जे काम ज्यांनी करायला पाहिजे होते त्यांनी फक्त आपलीच पाठ थोपटली तरीदेखील समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम करत आहेत याचा आम्हा सर्व महाराष्ट्रातील शिंपी समाजाला सार्थ अभिमान वाटतो असे यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.कमलाकर (आप्पा) कापडणे यांनी सांगितले. आज या ठिकाणी ज्या पदावर मी पोहचलो हे सर्व आपल्या समाज बांधवांच्या सहकार्यामुळे कारण त्यांचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी होते व यापुढेही राहतील असे मला वाटते, मी एक सामान्य गरीब शेतकरी कुटुंबात जन्म लेला आहे, त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी काय करावे लागते हे ज्याच्यावर बिकट प्रसंग येतात त्यालाच समजते, आज माझ्यासोबत अनेक संस्था अनेक कार्यकर्ते अनेक मित्र जोडले गेले आहेत त्यामध्ये दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील व डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर यांचा नामोल्लेख करणे गरजेचे आहे कारण त्यांच्यामुळेच आज मी हे कार्य करू शकलो, कारण त्यांची साथ नसती तर कदाचित मी हे करू शकलो नसतो म्हणून त्यांचा नामोल्लेख करणे मी गरजेचे समजतो असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.श्री.मनिलाल रतीलाल शिंपी यांनी सांगितले…

Related posts

ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा डी वाय फाउंडेशनचे संस्थापक दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम सप्ताहाचे आयोजन

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्यात झिका अलर्ट

Bundeli Khabar

Rainbow Pride of India Won by Beyonce and Ansh Tiwari

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!