32.7 C
Madhya Pradesh
May 7, 2024
Bundeli Khabar
Home » एसआयपी अकॅडमीच्या साहाय्याने कोविडच्या काळात महिलांचे सक्षमीकरण
महाराष्ट्र

एसआयपी अकॅडमीच्या साहाय्याने कोविडच्या काळात महिलांचे सक्षमीकरण

महाराष्ट्र / संतोष साहू
मुंबई : देशातील अग्रगण्य अबॅकस आणि ग्लोबलार्ट प्रशिक्षण अकॅडमी, एसआयपी इंडियाने १८ वा वर्धापनदिन साजरा केला या निम्मिताने एसआयपी ने कोविड काळात अकॅडमीच्या १४१ विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक गमावले आहेत त्यांना साडेतीन ते चार वर्षे चालणारा संपूर्ण कोर्सचा अभ्यासक्रम या मुलांना मोफत दिला जाणार आहे अशी घोषणा केली आहे .एसआयपी अकॅडमी ही ९५०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी असलेली एक नामवंत बाल कौशल्य विकास कंपनी आहे. २००३ मध्ये सुरू झालेले एसआयपी भारतासह २२ राज्ये आणि १४ देशांमध्ये उपस्थित आहे।


सुमारे ५,००० महिला, ८५० फ्रँचायझी आणि ४,००० कोर्स प्रशिक्षकांचा समावेश असलेल्या एसआयपी अकॅडमीने कोविड काळात ७५,०००हून अधिक मुलांसाठी २० लाखांहून अधिक तासांचे सत्र आयोजित केले होते. एसआयपी अकॅडमीचेआंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित अबॅकस आणि ग्लोबलआर्ट असे दोन शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनमुलांच्या मानसिक आणि जीवन कौशल्याच्या विकासावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. या अकॅडमीतील बरेच विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामध्ये उच्च शिक्षण घेतात।


एसआयपी अबॅकस आणि ग्लोबलआर्ट या दोन अभ्यासक्रमांसाठी भारतभराहून सुमारे ४,००० हून अधिक सर्व महिला शिक्षक आहेत.कोविडच्या काळात अभ्यासक्रम शिकवणे अवघड झाले होते. ऑनलाईन सिस्टीमवर स्विच करताना सर्वात मोठे आव्हान हे होते की मार्च २०२० पूर्वी त्यापैकी कोणीही ऑनलाईन वर्ग घेतले नव्हते परंतु अशाही परिस्थितीत. एसआयपी अकॅडमीने त्यांच्या सर्व शिक्षिकांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचे ट्रेनिंग देऊन संपूर्ण कोर्सचा अभ्यासक्रम ऑफलाईन मोड वरून ऑनलाईन वर स्विचकरून, कोविड कालावधीत एकही वर्ग न गमावता सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात एसआयपी सक्षम होते।


एसआयपी अकॅडमी चे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर म्हणाले की एसआयपी अकॅडमी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षक सर्व महिला आहेत शिक्षकांव्यतिरिक्त, अनेक महिला फ्रँचायझी उद्योजिका १५ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. काम आणि घर एकत्र आणणे हे समाजातील महिलांसाठी, विशेषतः उद्योजकांसाठी एक मोठे आव्हान नेहमीच असते. कोविड च्या काळात अनेक कुटुंबांना सामोरे जाणाऱ्या आर्थिक अनिश्चिततेमुळे हे आव्हान वाढले. बऱ्याच घरांमध्ये, सदस्य कमावणाऱ्या पुरुषांचे उत्पन्न कमी होते, किंवा अशा परिस्थितीत घरातील कर्त्या पुरुषांच्या नोकऱ्या देखील गेल्या।

Related posts

पूर्वांचल गौरव सम्मान 2022 की चयन प्रक्रिया आरम्भ

Bundeli Khabar

मुंबईत आज महारोजगार मेळाव्यात ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

Bundeli Khabar

घाटकोपर प्रकल्पअंतर्गत सही पोषण देश रोशन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!