22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » त्या ओला उबेर चालकाच्या खुनाचा तपास पूर्ण.
महाराष्ट्र

त्या ओला उबेर चालकाच्या खुनाचा तपास पूर्ण.

महाराष्ट्र / आर्चिस पाटील

भिवंडी : काही दिवसांपूर्वी भिवंडी मानकोली ब्रिज परिसराजवळ एका मारुती वॅगनआर कार नं. MH 04-HY-7560 मध्ये त्या कार चालकाचा मृतदेह आढळून आला होता।


पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनंतर समजले की त्या चालकाचे अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपी दोरीने गळा आवळून जीवे ठार मारुन पळुन गेले.
त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, भिवंडी युनिट नं 2 चे अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष गुरु रेड्डी वय 26 वर्षे ( रा. गायत्री नगर, बुद्ध विहार मागे, भिवंडी ) हा गायत्री नगर भिवंडी परिसरात आल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता. गुन्ह्यातील मयत प्रभाकर पांडू गंजी याची फिर्यादी पत्नी (आरोपी), तिची मैत्रीण व तिच्या ओळखीचा नितेश गोवर्धनवाला यांनी मुख्य आरोपी संतोष गुरु रेड्डी यांच्याशी संगनमत करून फिर्यादीच्या पतीला जीवे ठार मारणे करिता चार लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातील ऍडव्हान्स रक्कम एक लाख रुपये दिनांक 2/7/2021 रोजी मुख्य आरोपी संतोष रेड्डी यास दिले होते।


त्यानंतर संतोष रेड्डी व त्याचे साथीदार रोहित बचुटे व काशिनाथ लक्ष्मण धोत्रे ( सर्व रा. गायत्री नगर भिवंडी.) या तिन्ही आरोपींनी दिनांक 27/7/2019 रोजी मयताची उबेर कार बुक करून त्याचा खून करण्यासाठी त्यास वाडा येथे घेऊन गेले होते. परंतु त्या वेळी मयताची पत्नी आरोपी हिचा मुख्य आरोपी संतोष रेडी यास फोन आल्यामुळे आपण पकडले जाण्याची भीती वाढली. त्यामुळे आरोपींनी खुनाचा बेत रद्द केला. त्यानंतर मयताची पत्नी हिने आरोपींकडे खुनासाठी तगादा लावल्याने दिनांक 31/7/2021 रोजी मयत ओला उबेर चालक प्रभाकर गंजी यास ऐरोली नवी मुंबई येथे भाड्याने गाडी करून जाण्याच्या बहाण्याने त्याचा फोन करून बोलावले. कार मधून जात असताना मानकोली ब्रिज जवळ कार थांबवून दोरीच्या सहय्याने गळा आवळून त्यास जीवे मारले।


सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व इतर दोन आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. त्यापैकी मुख्य आरोपी संतोष गुरु रेड्डी यास गुन्हे शाखा, भिवंडी, युनिट नं 2 यांनी दिनांक 4/8/2019 रोजी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही व तपासाकरिता नारपोली पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले. तसेच दोन आरोपींचा अजून शोध सुरू आहे।


सदरचा गुन्हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, भिवंडी युनिट नं 2 व पोलीस निरीक्षक श्री अशोक होनमाने, सहा पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंगे, सहा पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, राजेंद्र सांबरे, अनिल पाटील, राजेंद्र चौधरी, नीता पाटील, श्रीधर हुंडेकरी, सचिन जाधव, भावेश घरत यांचे देखरेखी खाली सुरू आह।

Related posts

अकबर ट्रॅव्हल्सवर आयआरसीटीसीचे तिकीट एजंट बनून दरमहा ८०,००० रुपये कमवा

Bundeli Khabar

आशिर्वादच्या वक्तृत्वविकास व संभाषण चातुर्य प्रशिक्षण एक दिवसीय कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद

Bundeli Khabar

राज्य विकास कर्ज २०२३ ची ८.६३ टक्के दराने ९ जानेवारी रोजी परतफेड

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!