22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » स्वयं भूनागेश्वर देवस्थान चोरवणे भाविकांसाठी बंद
महाराष्ट्र

स्वयं भूनागेश्वर देवस्थान चोरवणे भाविकांसाठी बंद

महाराष्ट्र / संभाजी मोरे
रत्नागिरी : स्वयंभू श्री नागेश्वर देवस्थान हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये कवडगाव मध्ये समाविष्ट असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका चोरवणे गावाच्या माथ्यावर आहे।
पोसरे चोरवणे निवे या पंचक्रोशीत 21 जुलैपासून झालेल्या अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे देवस्थाना कडे जाणाऱ्या मार्गावरील चोरवणे श्री नागेश्वर पायरवने नदीवरील आळशी फुलाचा १५० फूट भरावा वाहून गेला आहे, या पुलापासून एलकेजी च्या नदीपर्यंत सात ठिकाणी भुस्खलनाने दरडी कोसळल्या आहेत आणि लाकडी पूलही वाहून गेले आहेत नदीपासून कोसबवन्याच्या माळा पर्यंत १०० फुट जांभळाची पाखाडी पुराच्या पाण्याने वाहून गेली तसेच मार्गावरील अनेक ठिकाणी लावले रेलिंग डोंगराच्या दरडी कोसळल्यामुळे शेकडो फूट तुटून पडल्या आहेत कोसबवने तोडणीचे पाणी पुतनीचे टेप येवल्याचा दंड म्हणजे कड्यापर्यंत चार ठिकाणी खोऱ्यामध्ये अंदाजे चार किलोमीटर पायवाट भूसखलन नाणे पूर्णता नष्ट झाल्या आहेत, पोळ्यामध्ये 20 ठिकाणी डोंगर खचला आहे सर्व पायवाटा नष्ट झाल्या आहेत कड्याच्या भागातील रेलिंग तुटून पडले आहेत।


श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थान समुद्रसपाटीपासून 832 मीटर उंचीवर सहयाद्रीच्या उंच माथ्यावर रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर निसर्ग ठिकाणी असून जवळच शिवकालीन वासोटा किल्ला आहे . नागेश्वर देवस्थान ठिकाणी हजारो शिवभक्त श्रावणी सोमवार महाशिवरात्रीनिमित्त गर्दी करीत असतात पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरण यामुळे भाविक हर हर महादेवाच्या जयघोषात नागेश्वर देवस्थान दर्शनासाठी येतात भाविकांनी दिलेल्या देणगीतून डोंगर माथ्यावर चोरवणे नागेश्वर देवस्थान कमिटीच्या माध्यमातून जलकुंभ (विहीर) बांधण्यात आले आहे परंतु जवळजवळ शासनाने लाखो रुपये निधी देऊन देवस्थान कार्यास सहकार्य केले आहे .
परंतु नुकत्याच झालेल्या महाप्रलयंकारी अतिवृष्टीमुळे देवस्थानाकडे जाण्याचे सर्व मार्ग नादुरुस्त झाले आहेत त्यामुळे काहीच दिवसात येणाऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नागेश्वर देवस्थान दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांनी देवस्थान ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन देवस्थान कमिटी सचिव मेजर विजय जाधव यांनी वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले।

Related posts

कृष्णा चौहान द्वारा आयोजित मिस बॉलीवुड ऑनलाइन ब्यूटी कांटेस्ट 2022 की विजेता बनी रोज़ खान

Bundeli Khabar

वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मिथुन प्रभाकर पाटील बिनविरोध।

Bundeli Khabar

टवाळ खोरांकडून मारहाणीच्या दोन घटना तर एकाची चारचाकी गाडी फोडली

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!