29.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » राज्य विकास कर्ज २०२३ ची ८.६३ टक्के दराने ९ जानेवारी रोजी परतफेड
महाराष्ट्र

राज्य विकास कर्ज २०२३ ची ८.६३ टक्के दराने ९ जानेवारी रोजी परतफेड

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.६३ टक्के महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज २०२३ ची परतफेड दि. ९ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.६३ टक्के महाराष्ट्र शासन कर्ज, २०२३ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. तसेच रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली, असे नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाचे सचिव शैला ए यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-११.१२/प्र.क्र.१८/अर्थोपाय दि.४ जानेवारी २०१३ अनुसार ८.६३ टक्के महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज, २०२३ अदत्त शिल्लक रकमेची दि. ८ जानेवारी २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. ९ जानेवारी २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि.९ जानेवारी २०२३ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घ्यावी.

Related posts

अनोखा सौंदर्य प्रतियोगिता ‘एवरग्रीन ब्यूटी कॉन्टेस्ट’ की विजेता बनी दीप्ती जोशी

Bundeli Khabar

बातमी लिहिताना माहिती हे तुमचं अन्न आहे व अन्न मिळाले तरच आपलं पोट भरू शकतो – कैलास म्हापदी

Bundeli Khabar

जैन हत्याकांड में आरोपी को जल्द गिरफ्तार करने की उठी मांग

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!