26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210913 WA0030
महाराष्ट्र

वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मिथुन प्रभाकर पाटील बिनविरोध।

Bundelikhabar

राजेंद्र पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी वळ ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी मिथुन प्रभाकर पाटील यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची अध्यासी अधिकारी स्थानी असलेल्या गावचे विद्यमान सरपंच राम भोईर यांनी उपसरपंच पदावर बिनविरोध निवड जाहीर केली.मिथुन प्रभाकर पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड होताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.त्यासोबतच गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांची देखील विशेष उपस्थिती होती.नवनिर्वाचित उपसरपंच प्रभाकर प्रभाकर पाटील यांनी सर्व ग्रामपंचायतीला सोबत घेऊन गावाचा विकास करण्याचा वादा ग्रामस्थांशी केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे, मा.सभापती सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे,मा.सभापती जि.प.सदस्य कुंदन पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक,शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील, दिलीप भोईर ,भाजपचे नेते हरिश्चंद्र भोईर,रामदास भोईर,वसंत भोईर,चंद्रकांत भोईर, मा.सभापती विकास भोईर,युवा नेते उपसरपंच सुमित सुरेश म्हात्रे,सरपंच रिंकल विजय पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख चक्रधरी पठील शाखा प्रमुख,अनंता भामरे,सचिन पाटील , संपर्क सचिव संदीप पाटील, उप शाखा प्रमुख दयाराम पाटील,तालुका सचिव दीपक पाटील,तालुका सचिव राजेंद्र काबाडी,जय भगत, विजय पाटील, हेमंत (मुस्सा भाई ) गुळवी ,जांभुलपाडा माजी सरपंच श्याम पारधी, संपर्क सचिव राजेंद्र पाटील ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक

Bundeli Khabar

बदमाशों को पकड़ने गई पुलिस टीम पर फायरिंग

Bundeli Khabar

शहापूर येथे विधी सेवा आणि शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!