24.4 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211002 WA00122
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक कामे मार्गी लागावीत म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ पुष्पाताई पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी माननीय श्री शेषराव बडे , यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ पुष्पाताई पाटील यांच्या दालनात विशेष बैठक आयाेजित केली हाेती.
शिक्षक सेना आणि मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातील सर्व विषय मुख्याध्यापक मान्यता , पर्यवेक्षक मान्यता , अल्पसंख्याक शाळेतील शिक्षक मान्यता ,अनुकंपा तत्त्वावरील मान्यता ,लिपिक वर्ग बढती मान्यता , वरिष्ठ व निवड श्रेणी यादी जाहीर करणे , मूल्यांकन ,ठाणे पालघर विभाजनातील रोस्टर शाळांचे प्रस्ताव शिफारस करून पाठवणे, संच मान्यता,इत्यादी विषयांवर सखोल चर्चा केली
निवेदनातील मुख्याध्यापक मान्यता ४ ऑक्टोबरपर्यंत सर्व करून देतो असे सांगितले, अन्य विषय ८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील असे शिक्षणाधिकारी शेषराव बडे साहेब त्यांनी आश्वासित केले
तसेच पे युनिट अधीक्षक श्री कांबळे यांची भेट घेतली संघटनेच्यावतीने पाठपुरावा करून बी.डी.एस काढण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळाली होती ,त्याचा फायदा म्हणून जुलै २०२१ पर्यंत पे युनिटकडे सादर केलेले व अनेक दिवसांपासून रखडलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फायनल पेमेंट मंजूर केले आहेत तसेच पी.एफ.ना परतावा सुद्धा मंजूर झालेला असून रक्कम दोन ते तीन दिवसांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, मेडिकल बिल व फरक बिलांसाठी वेगळे बीडीएस प्रणाली असते ती अद्याप शासनाकडून सुरू झालेली नाही ती सुरू करण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न केला जाईल, तसेच पीएफ स्लिपा मिळण्याकरता शिक्षक सेनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला जात होता त्यानुसार कार्यालयाकडून दिलेली लिंक ज्या ज्या शाळांनी भरली असेल त्या त्या शाळांचे क्रमवार स्लिपा देण्याचे काम केले जाणार आहे. कोणत्या शाळेने कोणत्या दिवशी यावे याचे नियोजन कळवले जाणार. नीट कार्यालयात जमा करावी असे अधीक्षक कांबळे साहेब यांनी सांगितले
सभेसाठी ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे संपर्कप्रमुख विष्णू विशे , उपाध्यक्ष श्री विलास अग्रेसर , उर्दू शिक्षक सेनेचे सचिव शेख शोएब शेख , ऐरोलीचे अध्यक्ष श्री भास्कर देशमुख , मुख्याध्यापक संघाचे सदस्य श्री तळलेले , भाई पष्टे ,श्रीमती पूजा कुलकर्णी , सल्लागार श्री खारीक , श्री संजय जोशी ,व अन्य पदाधिकारी व समस्या घेऊन आलेले शिक्षक उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ अर्जुन देशपांडे ने जेनेरिक आधार के तहत 51 नई दवाओं को लॉन्च किया

Bundeli Khabar

सर्वांच्या प्रयत्नामुळे माझा मुलगा सुखरूप घरी पोहोचला- सोन्या पाटील

Bundeli Khabar

ऑनलाइन पढ़ाई शॉर्ट फिल्म का आरे कॉलोनी में मुहूर्त संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!