40.7 C
Madhya Pradesh
June 8, 2026
Bundeli Khabar
मध्यप्रदेश

गाळेगाव येथील बोर्डवॉक ऍक्सिस लाप्रोमेनाड सोसायटीच्या रहिवाशांची घंटागाडी सुरू करण्याची मागणी

Bundelikhabar

गाळेगाव येथील बोर्डवॉक ऍक्सिस लाप्रोमेनाड सोसायटीच्या रहिवाशांची घंटागाडी सुरू करण्याची मागणी

सात दिवसात घंटागाडी सुरू न केल्यास अधिकार्‍यांच्या दालनात कचरा टाकणार – सुशील आरके

मुम्बई / संदीप शेंडगे
मोहोने : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील गाळेगाव येथील बोर्डवॉक लाप्रोमिनाड ॲक्सिस सोसायटीतील रहिवाशांनी घंटागाडी सुरू करण्याची मागणी केली आहे।
बोर्डवॉक सोसायटीत १४० फ्लॅटधारक असून गेल्या सात ते आठ महिन्यापासून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी दोन किलोमीटर मोहने स्मशानभूमी जवळ जावे लागते।
गाळेगाव परिसरात कचरा टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने येथील रहिवाशांना घरात कचरा साठवून ठेवावा लागत आहे. त्यामुळे गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आजूबाजूच्या परिसरात कचरा टाकल्यास स्थानिक गाववाले विरोध करतात तसेच आमच्या मालकी हक्काच्या जागेत तुम्ही कचरा कशाला टाकता म्हणून भांडायला येतात. त्यामुळे येथील रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने कचरा घरात साठवून ठेवावा लागत आहे त्यामुळे घरात दुर्गंधी पसरत असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घरातील पुरुष मंडळी कचरा टाकण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर असलेल्या मोहने स्मशानभूमी जवळ जातात. परंतु घरातील महिलांना इतक्या लांब कचरा टाकण्यासाठी जाणे शक्य होत नाही. या ठिकाणी २५ ते ३० लाख खर्च करून नागरिकांनी सदनिका खरेदी केल्या आहेत. तसेच येथील नागरिक नियमित पालिकेकडे कर भरणा करीत आहेत।
आम्ही नियमित पालिकेचा टॅक्स भरत असून तरी पालिका आम्हाला सुविधा पुरवत नसल्याने पालिकेच्या गलथान कारभाराविरोधात रहिवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे।
गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून येथे घंटागाडी येत नसून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत असे येथील रहिवासी जयदीप लोंढे यांनी सांगितले।

आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने घरात कचरा साठवून ठेवावा लागत आहे त्यामुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून मुले आजारी पडत आहेत असे येथील रहिवासी रूपाली आरके, रुक्मिणी सोनवणे, स्वाती भोईर, हेमा लोंढे, यांनी सांगितले।
येत्या आठ दिवसात येथील रहिवाशांसाठी घंटागाडी सुरू न केल्यास पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात कचरा आणून टाकणार तसेच जोपर्यंत घंटागाडी सुरू होत नाही तोपर्यंत पालिका अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा सुशील आरके यांनी दिला आहे।
याबाबत आरोग्य निरीक्षक गवाणकर यांना विचारणा केली असता घंटागाडी सुरू करण्याबाबत विचार विनिमय सुरू असून येत्या दोन दिवसात घंटागाडी सुरू करणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक गव्हाणकर यांनी दिली आहे.
पालिकेचे आरोग्य निरीक्षक गव्हाणकर यांनी घंटागाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले असले तरी घंटागाडी कधी सुरू होते याकडे येथील रहिवाशांचे लक्ष लागले आहे।


Bundelikhabar

Related posts

एमपी हाईकोर्ट से महाधिवक्ता पुरुषेन्द्र कौरव का स्तीफा

Bundeli Khabar

चरित्र प्रमाण-पत्र पर लाल स्याही से टिप्पणी लिखने वाले दो पुलिस कर्मी हुए निलंबित

Bundeli Khabar

हाथ मे कटोरा ले कर प्रदर्शन

Bundeli Khabar
error: Content is protected !!