29 C
Madhya Pradesh
July 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210803 WA00073
महाराष्ट्र

कोरोनाने वाचले … परंतु महापुराने नेस्तनाबूत केले …

Bundelikhabar

महाराष्ट्र / संभाजी मोरे

 कोकण : गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारी ने थैमान घातले होते त्यामुळे अनेक कुटुंबातील अनेकांचे मृत्यू झालेले यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले सरकारने अनेक उपाययोजना करूनही काही प्रमाणात कोरोना रोखण्यास सहकार्य लाभले. परंतु कोणाचा प्रादुर्भाव कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या सुरुवातीलाच कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील चारही जिल्ह्यातील सामान्य जनता पूर्ण नेस्तनाबूत झाली।

      मुसळधार पाऊस आणि नदी-नाले शुभम भरल्यामुळे कोकणातील चारही जिल्ह्यातील अनेक गावे भुईसपाट झाली मोठमोठे पूल नदी-नाले सर्व वाहून गेले ग्रामीण भागात भागातील शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन केलेली शेती नदी नाल्यांमध्ये वाहून गेली. मोठमोठ्या दरडी कोसळून अनेक ठिकाणी मनुष्यहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली, याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूण तालुक्यातील शहरी विभाग विभागात छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यापारी बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे पूर्ण भुईसपाट झाली त्याचबरोबर देशाचे भवितव्य ग्रामीण भागातील शेतकरी यांची भात शेती नदी नाल्यात वाहून गेली काही ठिकाणी दरडी कोसळल्याने कायमचीच शेतीयोग्य राहिली नाही प्रत्येक गावागावातील नदी नाल्यावरील फुल साकव वाहून गेल्याने अनेक दिवस आपल्या राहिलेल्या घरा बिना बाहेर पडणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून बौद्ध समाजातील अनेक घरे व गोठे दरडीखाली कायमचे जोडले गेले येथून पुढे चोरवणे निवे सापिर्ली येथील नदी नाल्यावरील मोठमोठे पूल साकव वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले अनेकांची तर अन्नान्नदशा झाली . त्याचबरोबर पोसरे सडेवाडी ,साखर बामणवाडी , तळवट पाली येथे दरडी कोसळून अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले अनेक ठिकाणी घरांना कडे गेले त्यामुळे ग्रामस्थ पूर्ण नेस्तनाबूत झाल्याप्रमाणे आहे शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी सर्वे काम चालू असून लवकरच नदी नाल्यावरील पूल दुरुस्त केले जातील याचे फक्त आश्वासन मिळाले आहे अजुनही कुठेहि शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही. सर्व गावच्या पाण्याच्या विहिरी नदी मध्ये विलीन झाल्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आम्ही शेतकरी म्हणून जन्माला आलो शेती करतो आज आमच्या गुन्हा आहे का असे प्रत्येकाला वाटत आहे।

     संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक दानशूर व्यक्तींनी संस्थांनी व्यक्तिगत येऊन प्रत्येकाचा घर संसार पुन्हा उभा राहावा यासाठीच काहीना काही अन्नधान्य कपडेलत्ते देण्याचे काम करत आहेत।

परंतु शेतीचे झालेले नुकसान शेतकर्‍यांच्या मनावर झालेले घाव कोणीही भरून काढू शकत नाही या नैसर्गिक आपत्तीला अनेक लोक जबाबदार आहेत असेही ग्रामस्थांच्या माध्यमातून बोलले जात आहे।

IMG 20210803 WA00072

Bundelikhabar

Related posts

शिवशांति प्रतिष्ठान द्वारा किया गया महावृक्षारोपण अभियान

Bundeli Khabar

रॉनी रॉड्रिग्स द्वारा आयोजित दिवाली स्नेह मिलन समारोह में मीनाक्षी शेषाद्रि, राहुल रॉय और दीपक तिजोरी की उपस्थिति…

Bundeli Khabar

रक्षाबंधनानिमित्त ट्रेलचा ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ उपक्रम,भावा-बहिणीमधील प्रेमाचे नाते करणार साजरे

Bundeli Khabar
error: Content is protected !!