25.7 C
Madhya Pradesh
August 20, 2026
Bundeli Khabar
IMG 20210802 WA0011
महाराष्ट्र

खोट्या व बनावट दस्तऐवज प्रकरणी शागिर्द डेकोरटर्स चे मालक पिता पुत्रावर गुन्हा दाखल, अटक कधी

Bundelikhabar

मुम्बई / मोहन पाटील
मुंबई : आठ महिन्याच्या प्रदीर्घ पाठपुराव्या नंतर अखेर ७७ वर्षांच्या वृध्द महिलेस न्याय मिळाला असून,खोटे व बनावट दस्तऐवज बनविल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी शागिर्द डेकोरटर्स चे मालक पिता पुत्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्हा दाखल झाल्याने मीरा भाईंदर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे,त्यामुळे योग्य तपासानंतर या प्रकरणातील मोठी साखळी उजेडात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।


सविस्तर वृत्तांत; भाईंदर पश्चिम येथील राईगाव येथे राहणाऱ्या जयश्री प्रभाकर म्हात्रे वय ७७ वर्षे यांची गावमौजे मोरवा येथे सर्वे नंबर जुना१८५ हिस्सा नंबर २६ व नवीन सर्वे नंबर ३ हिस्सा नंबर २६ ही ३.३० गुंठे जागा आहे. ही जागा जयश्री प्रभाकर म्हात्रे यांच्या नावे असून या जागेत शागिर्द डेकोरटर्स चे मालक जगदेव म्हात्रे व विमोग म्हात्रे यांनी अनधिकृत नाट्यमंच बांधला आहे . हा अनधिकृत नाट्यमंच आपल्या मालकी जागेत असल्याने सदर नाट्य मंच चे बांधकाम निष्काशीत करण्याची लेखी मागणी जयश्री म्हात्रे यांनी २ नोव्हेंबर २०२० रोजी महानगरपालिकेला केली होती।

मात्र महानगरपालिका मध्ये बसलेल्या काही दलाल अधिकाऱ्यांनी ही बातमी शागिर्द डेकोरटर्स च्या मालक पिता पुत्रास दिली.या माहितीमुळे या पिता पुत्रांनी त्वरित हालचाल करून खोट्याव बनावट कुल मुख्यातर व जुना साठेकरार या अन्वये ही जागा जगदेव म्हात्रे यांनी त्यांचे पुत्र विमोग म्हात्रे यांना १२नोव्हेंबर २०२० रोजी विकली असल्याचे दाखविले,मात्र हे करताना त्यांनी जयश्री म्हात्रे व त्यांच्या मुलांच्या खोटी नावे व खोट्या सह्या मारून बनावट दस्ताऐवज तयार करून नोंदणीकृत केले.त्या बनावट दस्तऐवज चा क्रमांक१६०३९ असून परिपूर्ण असा तयार करण्यात आला व उपनिबंधक ठाणे २ या ठिकाणी नोंदविला गेला.सदर बनावट दस्त बनवून शागिर्द डेकोरटर्स चे मालक पिता पुत्रांनी तो तलाठी कार्यालयात फेरफार मंजुरी साठी दिला होता. दरम्यानच्या काळात जयश्री म्हात्रे यांच्या मुलाने नेटवर सातबारा सर्च केला असता त्यावर प्रलंबित फेरफार शेरा आल्याने वरील प्रकार उघडकीस आला. याचवेळी जयश्री म्हात्रे यांच्या मुलांनी त्वरित दुय्यम निबंधक कार्यालय ठाणे यांच्याकडून या दस्तऐवज च्या साक्षांकित प्रति मागविल्या असता झालेल्या पूर्वनियोजित या बनावट दस्तऐवज चि माहिती मिळाली.घडलेल्या या भयानक प्रकाराबाबत जयश्री म्हात्रे यांनी त्वरित जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे,तहसीलदार भाईदर,तलाठी कार्यालय भाईंदर येथे आक्षेप नोंदवून फेरफारा ला हरकत घेतली.अशा या बनावट व खोट्या दस्तऐवज संदर्भात जयश्री प्रभाकर म्हात्रे यांनी मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. गेले आठ महिने या अर्जावर सतत पाठपुरावा केल्याने अखेर जयश्री म्हात्रे यांच्या परिवाराला यश मिळाले आहे।
सदर गंभीर प्रकाराबाबत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद
दाते यांनी जातीने लक्ष देऊन तसेच डी सि पी अमित काळे यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदर तपास त्या च्याकडे वर्ग करण्यात आला होता. अशा या गंभीर प्रकरणात अमित काळे यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केल्याने अखेर काल दिनांक गुरुवार २९/७/२०२१ भाईंदर पोलिसांनी गुन्हा नंबर ०२९७ भारतीय दंड विधान संहिता ३४,४२०,४६५,४६७,४७१,४७४ अन्वये गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करून या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश केला जाईल असे तपास अधिकारी यांच्या कडून सांगण्यात आले।
मात्र नमूद संशयित आरोपी हे मातबर असल्याने त्यांना अटक कधी होईल याचीच चर्चा मीरा भाईंदर परिसरात आहे,यामुळे सदर प्रकारात भाईंदर पोलिसांचा ही कस लागण्याची
शक्यता वर्तविण्यात येत आहे,तर दुसरीकडे या गंभीर प्रकरणात पोलीस आयुक्त यांचे स्वतःचे गांभीर्य पूर्व लक्ष असल्याने फिर्याद देणार्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे।


Bundelikhabar

Related posts

सिडको के उपाध्यक्ष और प्रबंध निदेशक डॉ. संजय मुखर्जी द्वारा विशेष समिति का किया गठन

Bundeli Khabar

पालघर विभागीय एस टी आगरातून, गौरी गणपती साठी कोकणात जाणार्‍याना बसेसची कमतरता पडता कामा नये – श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

Bundeli Khabar

जन आशीर्वाद यात्रा के आयोजकों के खिलाफ पांच पुलिस स्टेशनों में विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज

Bundeli Khabar
error: Content is protected !!