29.9 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20210830 WA0034
महाराष्ट्र

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मालेगाव येथे सुप्रसिद्ध रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली १०x१५ फुटाची भव्य दिव्य रांगोली

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
मालेगाव : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शरद नगर कलेक्टर पट्टा, गणेश मंदिरा जवळ,मालेगाव, नाशिक येथे साई आर्ट संस्थेचे संचालक सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य १०x१५ फुटाची रांगोळी साकारण्यात आली.तसेच ह्या रांगोळी मध्ये रंग भरण्यासाठी मोनाली बच्छाव, कल्याणी बागुल, ईशा बागुल,भाग्यश्री निकम,रितल महाजन, आंचल आर्वी (माळी),प्राची माळी, प्रतीक्षा देवरे,करीना सूर्यवंशी, वैशाली खैरनार,भाग्यश्री पाटील,अंकिता जगनाडे, तेजस्वीनी बावणे, प्रशांत आर्वी (माळी)जयेश सैंदाने, तेजस माळी, ह्या कलाकारांचा सहभाग होता.तसेच ही रांगोळी काढायला दिवस रात्र तब्बल ७२ तास लागले. ही रांगोळी १०×१५ आकारात आहे.हे रांगोळी प्रदर्शन दिनांक ३०/८/२१ रोजी सकाळी ११:०० वाजे पासून सुरू होणार आहे।

(धर्मजागरण पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आर. एस.एस. नाशिक जिल्हा प्रमुख) मा.श्री प्रदीप (आबा) हरिभाऊ बच्छाव व ( जिल्हाध्यक्ष भाजपा मालेगाव) नगरसेवक तथा गटनेता भाजपा म.न.पा. मालेगाव) सदस्य जिल्हा नियोजन समिती नाशिक) मा.श्री.सुनील आबा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले.तसेच अधिक माहितीसाठी श्री प्रमोद आर्वी यांच्या ७८४०९६७६२७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा।


Bundelikhabar

Related posts

‘बाला साहेब जिंदा होते तो उद्धव ठाकरे को मार देते गोली’ – बीजेपी नेता नारायण राणे…

Bundeli Khabar

बोरिवली में अगले सप्ताह खादी महोत्सव का आयोजन

Bundeli Khabar

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळ आंदोलन

Bundeli Khabar
error: Content is protected !!