30.5 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20210802 WA00052
महाराष्ट्र

अभिनव विद्यामंदिर शाळेतील समाजसेवक शिक्षक विलास आंग्रे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

Bundelikhabar

मुम्बई / जगताप सुनील
कल्याण : छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर कल्याण या शाळेतील तंत्रविभागात निदेशक या पदावर गेल्या 34 वर्षापासून यशस्वी सेवाकाळ पूर्ण केल्याबद्दल संस्थेतील प्रमुख पदाधिकारी आणि शिक्षकांच्या वतीने विद्यालयाच्या डॉ.आनंदीबाई जोशी सभागृहात निवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता।
या कार्यक्रमास छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य ना.क.फडके संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, कोषाध्यक्ष धनंजय पाठक, कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर, मुख्याध्यापक संपत गिते, पर्यवेक्षक अशोक भैलुमे , आजी माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि नातेवाईक मित्र मंडळी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले।

मान्यवरांनी शिक्षक विलास आंग्रे यांचा जीवनपट आपल्या मनोगतातुन व्यक्त केला. त्यांनी आतापर्यंत केलेल्या समाजसेवेच्या अरे आला कार्याला मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उजळणी दिली. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिक्षक विलास आंग्रे यांनी आपला सेवा काळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले तर इथून पुढे आंग्रे यांची समाजसेवा अधिकाधिक बहरत जावी अशा शुभेच्छा देखील दिल्या।
शाळेच्या वतीने विलास आंग्रे यांना सेवागौरव प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या मित्रमंडळींचे आणि नातेवाईकांचे स्वागत शिक्षकांनी भेटवस्तु देऊन करण्यात आले।
सांस्कृतिक विभाग प्रमुख सुलक्षणा पाटील यांनी शिक्षक आंग्रे यांनी आपला यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छापत्रे दिली होती ती पत्रे सुलक्षणा पाटील यांनी वाचून दाखवली. यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद सदस्य आमदार जयंत दि.आसगावकर पदवीधर मतदारसंघ कोकण विभाग आमदार निरंजन वसंत डावखरे, आमदार गणपत गायकवाड, नागपूर शिक्षक मतदार संघाचे ना.गो.गाणार आणि छत्रपती शिक्षण मंडळाच्या चिटणीस आणि ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय कल्याण येथील मुख्याध्यापिका मिनाक्षी गागरे यासर्वांकडून आलेल्या शुभेच्छा पत्रांचे सुरेख वाचन केले।
सत्कारमुर्ती शिक्षक विलास आंग्रे यांच्या विनंती नुसार कोणीही भेटवस्तू न देण्याचे कळविले होते. केवळ शालेय उपयोगी वस्तू भेट म्हणून स्वीकारणार असे असे जाहीर केल्याने मान्यवरांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन गरिब व गरजु विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, पॅड, वह्या भेटवस्तू मोठ्या प्रमाणात आणल्या होत्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत गिते यांच्याकडे या सर्व वस्तू सुपूर्द केल्या. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील शिक्षकांनी उत्तम सहभाग घेतला तर. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गितांजली अहिरे, मान्यवरानंचा परिचय संगिता आंबेरकर यांनी केला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन पाटील यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक व पालक त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।

IMG 20210802 WA00053

Bundelikhabar

Related posts

कुर्ला में गांधी मैदान से अतिक्रमण मुक्त कराने को सरकार राजी

Bundeli Khabar

राम सेतु समुद्रात बुडाला

Bundeli Khabar

वाचनाने सकारात्मक दृष्टिकोन मिळतो – स्वप्नील पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!