39.2 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » जिल्हा परिषदेच्या १४६ कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदल्या
Uncategorizedमहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या १४६ कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदल्या

बदल्यांमुळे रिक्त पदांचे समानीकरण करण्याचा प्रयत्न – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे
जिल्हा परिषदेच्या १४६ कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदल्या

मुम्बई / प्रमोद कुमार
ठाणे दि.२९: जिल्हा परिषदेच्या गट क आणि ड वर्गाच्या विविध संवर्गातील १४६ कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार नुकत्याच करण्यात आल्या. या बदल्यामुळे पाचही तालुक्यातील रिक्त पदांचे समानीकरणं करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे श्री.दांगडे यांनी सांगितले।

यह भी पढ़ें-कोळी समाजाच्या दोन युवकांचा व्यापारी संघटनेकडून जाहीर सत्कार.

कोविड१९ नियमांचे काटेकोरपणे पालन करून ही बदली प्रक्रिया एन. के.टी कॉलेजच्या सभागृहात समुपदेश पद्धतीने पार पडली. यामध्ये प्रशासकीय , विनंती आणि आपसी अशा तीन पध्दतीने बदल्या झाल्या. या बदली प्रक्रिये दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
आदिवासी क्षेत्रातील रिक्तपदे प्राधान्याने भरण्यात आली.या बदल्या करताना समानीकरण तत्व अवलंबतांना शहापूर,मुरबाड व भिवंडी तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील रिक्तपदे प्राधान्याने भरण्यात आली।
विभागनिहाय बदल्यांचे तपशील खालीलप्रमाणे:
सामान्य प्रशासन विभाग
वरिष्ठ सहाय्यक – १
कनिष्ठ सहाय्यक – ६
पशुसंवर्धन विभाग
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी – २
पशुधन पर्यवेक्षक – ४
व्रणोपचारक – २
ग्रामीण पाणी पुरवठा
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) -३
महिला व बालविकास विभाग*
पर्यवेक्षिका – ९
अर्थ विभाग
कनिष्ठ लेखाधिकारी – १
शिक्षण प्राथमिक विभाग
केंद्रप्रमुख – ९
विस्तार अधिकारी शिक्षण -४
बांधकाम विभाग
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य)- ६
आरोग्य विभाग
आरोग्य सेवक पुरुष – २
आरोग्य सेवक महिला – ८
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १
औषध निर्माण अधिकारी – ८
ग्रामपंचायत विभाग
ग्रामविकास अधिकारी – १२
ग्रामसेवक – ६८
एकूण १४६

Related posts

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

Bundeli Khabar

फिल्म काली के निर्माता को द्वारकामाई चैरिटी संस्था की सख्त चेतावनी

Bundeli Khabar

गौरीशंकर चौबे का सम्मान समारोह संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!