34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ
महाराष्ट्र

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जानेवारी, २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार ४६.४५ चौ.मी. (५०० चौ. फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार आता या निर्णयाची १ जानेवारी २०२२ पासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील १६.१४ लाख निवासी मालमतांना या संपूर्ण कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. या सवलतीमुळे महापालिकेच्या कर महसुलात सुमारे ४१७ कोटी आणि राज्य शासनाच्या महसुलात सुमारे ४५ कोटी असा एकूण ४६२ कोटींचा महसूल कमी होणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी २०१७ मध्ये शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळताच लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार प्रशासनाने ५०० चौरस फुटांपर्यंतचा कर माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. पण सरसकट मालमत्ता कर माफ झाला नाही. तर या प्रवर्गातील सर्वसाधारण कर फक्त रद्द झाला होता.

Related posts

बंदूकीचा धाक दाखवून ट्रान्सपोर्टरसह दोघांचे अपहरण

Bundeli Khabar

स्प्रिंटर क्लब कोनगांव आयोजित अथेलेटिक स्पर्धा कोनगांव येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Bundeli Khabar

ठाणे महापालिका आयुक्तांनी केली रेल्वे पास मदत कक्षाची पाहणी : मनुष्यबळ वाढविण्याचे दिले निर्देश

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!