31.8 C
Madhya Pradesh
July 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210903 WA00132
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवली महानगरपालिका ,आर एस पी अधिकारी युनिट आणि कल्याण शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका ,आर एस पी अधिकारी युनिट आणि कल्याण शिक्षक सेना यांचा यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम विभाग प्रमुख सुनील वायले यांच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ कल्याण विभागीय कार्यालय येथे आर एस पी अधिकारी, शिक्षक युनिट, आणि शिक्षक सेना कल्याण यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली. कल्याण पश्चिम व वसंतव्हॅली परिसरात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, तसेच हे लसीकरण केंद्र नियमित सुरू राहणार आहे .तरी कल्याण परिसरातील लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आर एस पी कमांडर डॉ. श्री. मनीलाल शिंपी यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्थ नागरिकांना केले आहे.मुंबई विद्यापीठ उपकेंद्र येथे, कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.याठिकाणी दररोज १००० लाभार्थींना लसीचा लाभ घेता येणार आहे.कल्याण आर एस पी युनिटचे कमांडर मनीलाल शिंपी यांच्यासह अधिकारी अनंत किनगे ,बंशीलाल महाजन, भगवान परदेशी, बापू शिंपी, महादेव शिरसागर, आर आर भोकनल, जितेंद्र सोनवणे,किरण वसईकर,यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कल्याण शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रशांत भामरे व शिक्षक सेना पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.आयोजक सुनीलजी वायले यांनी परिसरातील लोकांसाठी जी लसीकरण सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच हे स्ट्युत उपक्रम असल्याने सुनिल वायले यांचे सर्व नागरिकांच्या वतीने डॉ.श्री. मनीलाल शिंपी यांनी आभार व्यक्त केले आहेत।

IMG 20210903 WA00133

Bundelikhabar

Related posts

करीरोड येथील कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांच्या तसबीरीचे अनावरण

Bundeli Khabar

मुम्बई में शशिकला महेंद्र पाल के ‘पाल इन्शुरन्स सर्विसेस’ कार्यालय का उद्घाटन

Bundeli Khabar

कस्तूरबा हॉस्पिटल में गैस लीक का मामला आया सामने

Bundeli Khabar
error: Content is protected !!