41.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ७ दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी ३ हजार रुपये धनादेशाचे वाटप.
देश

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ७ दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी ३ हजार रुपये धनादेशाचे वाटप.


मुम्बई/भगवानदास


भिवंडी : कुरुंद ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ७ दिव्यांग नागरिकांना २७ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  दिव्यांग टक्केवारीनुसार प्रत्येकी ३ हजार रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले.श्रमजीवी संघटनेनेचे तालुकाध्यक्ष सुनिल लोणे यांनी दिव्यागांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांग टक्केवारीनुसार अर्थसहाय्य देण्याची मागणी केली होती.त्यानुसार ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली केदार,उपसरपंच योगेश पाटील व ग्रामविकास अधिकारी किशोर गोडसे व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांकडून निर्णय घेऊन हे धनादेश वाटप करण्यात आले.राज्य सरकारने निर्देशित केलेल्या प्रत्येक शासकीय कार्यालयास त्यांच्या उत्पन्नांपैकी नियोजित दिव्यांग टक्केवारीनुसार दिव्यांग, अपंग, मूकबधिर, अंध, मतिमंद।

यह भी पढ़ें-फ्रॉड:फर्जी अप्रूवल ले कर बेच दीं आधा दर्जन गाड़ी

बहू विकलांग व्यक्तींना साह्य करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.प्राथमिक स्वरुपात ७ लाभार्थ्यांना धनादेश वाटप केले असुन येणा-या काळात दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास पाटील,सरपंच दिपाली दिलीप केदार, उपसरपंच योगेश भगवान पाटील, सदस्य श्रीकांत रामचंद्र गायकर,मोतीराम गव्हाळे,श्याम पाटील,साईनाथ पाटील,एकनाथ भोईर,मुकेश जाधव,सदस्य निकिता मुकेश जाधव,सदस्य भाई हरिभाऊ पाटील,सदस्य जानवी जगदीश पाटील,सदस्य रेश्मा गणेश वाघे, सदस्य विशाखा विश्वनाथ भोईर, सदस्य सुनिल रामचंद्र मोरे ,सदस्य संदीप जगन्‍नाथ काठोळे,सदस्य भावना भगवान सांबरे,ग्रामविकास अधिकारी किशोर कृष्णा गोडसे,ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

Related posts

27 साल के महत्वपूर्ण कार्यकाल के बाद टी सीरीज को छोड़ चले विनोद भानुशाली

Bundeli Khabar

भविष्य की आहट / डा. रवीन्द्र अरजरिया

Bundeli Khabar

श्रीमती द्रोपदी मुर्मू होगीं राष्ट्रपति पद के लिए एनडीए उम्मीदवार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!