34.6 C
Madhya Pradesh
July 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210728 WA0009
देश

बुलेट रायडर्स चे नंदनवन लेह लडाख

Bundelikhabar

मुम्बई / ब्यूरो
टिटवाळा : साहस, थरार आणी भीती याचे उत्तम उदाहरण असलेला आणि सर्व बाईक रायडर्स साठी नंदनवन असलेला जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड म्हणजेच खरदुंगला पास होय. हाच खरदुंगला पास सर करण्याचा निर्णय टिटवाळयातील 11 जणांनी घेतला. सुमारे एक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीवर मात करत सर्व 11 जण खरदुंगला पास येथे पोहोचले।

यह भी पढ़ें-आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ७ दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी ३ हजार रुपये धनादेशाचे वाटप.

जगातील अनेक बाईक रायडर्स आपली रायडिंग कौशल्य पणाला लावून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत असतात. मनाली – लेह – खरदुंग ला – नुब्रा व्हॅली – पांगोंग लेक – श्रीनगर हा एक परिपूर्ण साहसाने भरलेला, शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी घेणारा व एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उत्तुंग हिमालय पर्वत रांगा असलेला मोटरेबल रोड आहे।


या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहतांग ला पास (3980 मीटर), बारालाचा ला पास (4830 मीटर), तांगलांग ला पास (5360 मीटर), खार्दुंगला पास (5602 मीटर), चांग ला पास (5391 मीटर), फाटू ला पास (4108 मीटर), आणि शेवटी झोझिला पास (3528 मीटर) अश्या अनेक उंचावरील घाट रस्त्यांना सामोरे जावे लागते. कधी खूप उन, पाऊस, हिमवर्षाव, कडाक्याची थंडी, हिम स्खलन, दरड कोसळणे अशा अनेक नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते. ऊंच प्रदेशात रायडिंग करताना बऱ्याच रायडर्स ना ऑक्सिजन ची कमतरता भासते या सर्वांवर मात करत जे रायडर्स लडाख ची सफर पूर्ण करतात ते एक अविस्मरणीय अनुभव कायम लक्षात ठेऊन धरतीवरील स्वर्ग बघून माघारी फिरतात. हा स्वर्ग सुखाचा अनुभव आणि अविस्मरणीय प्रवासाच्या आठवणी डोळयात साठवून टिटवाळा येथील 11 युवक माघारी परतले. लडाख या ठिकाणी डोळ्यात समावून घ्यावे असे निळेशार पाणी असलेला पंगोंग तलाव, निसर्ग सौंदयाने नटलेली नुब्रा व्हॅली, केवळ 4 महिने पर्यटकांसाठी खुले असलेले लेह लडाख शहर आणि भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास सांगणारे कारगिल वॉर मेमोरियल स्मारक अश्या काही वैशिष्ठ्य पूर्ण ठिकाणे बघायला मिळाले।


टिटवाळा या छोट्याशा शहरातून 11 युवकांनी बुलेट रायडिंग चे हे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. धरतीवरील सर्वात उंच मोटरेबल रोड असलेल्या खारदुंग ला पास या ठिकाणी बुलेट वर पोहोचून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. राज्य युवा पुरस्कार विजेते श्री विनायक कोळी सर यांच्या नेतृत्वाखाली आणि अनुभवी रायडर व क्रीडाप्रशिक्षक श्री हरीष वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाखली नगरसेवक श्री संतोष तरे, श्री आनंद जाधव, श्री विनोद देशेकर, श्री संतोष पाटील, श्री संतोष मुंढे, श्री गणेश गायकवाड, अक्षय पगारे, हनुमंत भांगे, तनय तिवारी या युवकांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे।


Bundelikhabar

Related posts

यूक्रेन से लौटे छात्रों की सुध लेने में जुटा शासन-प्रशासन

Bundeli Khabar

राज्यपाल से उपमहापौर ने की मुलाकात

Bundeli Khabar

शौर्य चक्र पैरा कमांडो मधुसूदन सुर्वे पर बायोपिक बनाएंगे नीरज पाठक

Bundeli Khabar
error: Content is protected !!