डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणु २०२५/२६ मध्ये १५ जानेवारी रोजी होणारया निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करत मैदानात उतरलेले डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २४ मधील शिवसेनेचे चार नगरसेवक बिनविरोध विजय झाले आहेत. १) रमेश म्हात्रे, २) विश्वनाथ राणे, ३) वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार एकाच पॅनल मधून बिनविरोध विजयी झाले आहेत. तसेच पॅनल क्र. २८ मधून शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार हर्षल राजेश मोरे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे सुपुत्र बिनविरोध विजयी झाले आहेत.



तसेच या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून येत विजयाला सुरुवात केली होती. आतापर्यंत एकूण महायुतीचे ९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या तिन्ही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याचे हे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.
@महाराष्ट्र प्रभारी राकेश चौबे (बैखौफ भारतीय)

