- कल्याण : मांडा टिटवाळा येथील रहिवाशी शीलाताई रामदास नवाळे या येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुक प्रक्रियेमध्ये भारतीय काँग्रेस पार्टी कडून नगरसेवक पदाच्या उमेदवार म्हणून निवडून रिंगणात उतरले आहेत. शिलाई शीलाताई नवाळे एक सामाजिक कार्यकर्त्या असून, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेवर ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी तसेच आता सध्या त्या मुंबई शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक लेवल ला त्या कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या दक्षता कमिटीवर तसेच ठाणे जिल्हा दक्षता कमिटीवर कमिटीवर गेली तेरा वर्षे कार्यरत आहेत. सामाजिक कामाचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी मागील काही वर्षात एससी एसटी आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. तर स्थानिक रहिवाशी आदिवासी, मुस्लिम, समाजाच्या घरावर महानगरपालिके कडून होणाऱ्या बुलडोझर, कारवाईला आवाहन करत, जवळजवळ १५० आदिवासी, व मुस्लिम, रहिवाशांना पक्की घरे मिळवून देण्याचे काम सुद्धा त्यांनी सामाजिक कार्यातून केलेला आहे. महिला सक्षमीकरणासाठी नेहमी कार्यरत असतात. येत्या महानगरपालिका निवडणुकीत उतरण्या च्या पाठीमागचे कारण म्हणजे जनतेचा विकास करणे, जनतेची अडचणी सोडवणे, रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न गटारीचे प्रश्न तसेच सभोवताली पसरलेला कचरा हा मोठा प्रश्न आहे. एकूण हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणून आणि त्या पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एस सी एस टी आरक्षण वाचवायचे असेल तर भारतीय जनता पार्टीला प्रत्येक ठिकाणावरून सत्तेतून हद्दपार करणे गरजेचे असल्याचे आव्हान त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे.
@महाराष्ट्र प्रभारी राकेश चौबे (बैखौफ भारतीय)

