24.2 C
Madhya Pradesh
August 6, 2026
Bundeli Khabar
IMG 20260110 WA0010
महाराष्ट्र

पॅनल क्रमांक ७ ड चे अधिकृत उमेदवार संदीप गायकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…

Bundelikhabar

कल्याण : कल्याण, पश्चिमेतील भगवा तलाव (काळा तलाव) येथे संदीप एकनाथ गायकर यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. आमदार नरेंद्र पवार, तसेच पॅनल क्रमांक ७ चे सर्व उमेदवार त्यामध्ये सौ हेमलता नरेंद्र पवार, पॅनल क्रमांक ७ क सर्वसाधारण महिला, तसेच शामल मंगेश गायकर पॅनल क्रमांक ७ ब नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, आणि विजया अरविंद पोटे पॅनल क्रमांक ७ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, इत्यादी सर्व उमेदवार तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप गायकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची निशाणी नगाडा आहे. मात्र अर्ज भरून झाल्यानंतर काही वेळात पक्षाकडून एबी फॉर्म कन्फर्म झाल्यामुळे संदीप गायकर हे महायुतीसोबत लढत आहेत. कल्याण शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीला कल्याण मध्ये मजबूत करण्याचे काम करणारे, तसेच जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेले नेतृत्व कामातून ओळख निर्माण करणारा लोकप्रतिनिधी व विकासाला प्रथम प्राधान्य देणारा कार्यकर्ता म्हणून संदीप गायकर यांची ओळख आहे. शिक्षण बीए (पॉलिटिकल सायन्स) असून २००५ ते २०१० तसेच २०१५ ते २०१९ असा दहा वर्षाचा नगरसेवक पदाचा अनुभा तसेच जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव असलेला कार्यकर्ता, या काळात काम करताना त्यांनी शहराच्या मूलभूत गरजाबरोबर दीर्घकालीन विकास दृष्टी ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नगरसेवक किंवा स्थायी समिती सभापती असताना त्यांनी अनेक कामांसाठी पाठपुरावा केला. त्यामध्ये शहरासाठी आवश्यक नवीन विकास कामांचा समावेश शहर सुशोभित करण्यासाठी भर देणारे, नाविन्यपूर्ण प्रस्ताव कल्याण सिटी पार्क या महत्वकांक्षी प्रकल्पाला गती गती देण्याचा काम असेल, भूजल पातळी वाढवणाऱ्या जलसंचय कामांना प्राधान्य देण्याचं काम असेल, तसेच महानगरपालिकेत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक ठाम भूमिका घेणारा, तसेच आर्थिक अडचणी असताना ४२०, कोटी रुपयांच्या चुकीच्या खर्चाला विरोध करणारा, आचार्य रंग मंदिराचे अत्याधुनिक नूतनीकरण उदयोन्मुख खेळाडूंना शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन, कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चे सलग तीन वर्ष यशस्वी आयोजन, यांची दखल राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माध्यमाने घेतली, २००८ ते २००९ या कालावधीत स्थायी समिती सदस्य असताना रमाबाई आंबेडकर उद्यानात पाण्याची टाकी मंजूर करून तिचे काम पूर्ण केले होते. नगरसेवक तसेच स्थायी समिती सभापती या पदाचे मिळणारे वेतन आज पर्यंत वैयक्तिक मदतीसाठी देणारा हा पहिला कार्यकर्ता आहे.

 

@महाराष्ट्र प्रभारी राकेश चौबे (बैखौफ भारतीय)

 


Bundelikhabar

Related posts

तहसीलदार व चपरासी को रिश्वत लेते हुए रंगे हाथ किया गिरफ्तार

Bundeli Khabar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा तर्फे प्रविण दरेकरचा जाहिर निषेध करण्यात आला

Bundeli Khabar

शेमारू हिंदू भजन स्पीकर’ से त्यौहारों के उल्लास को बनाएं विशेष

Bundeli Khabar
error: Content is protected !!