27.2 C
Madhya Pradesh
July 4, 2026
Bundeli Khabar
IMG 20260109 WA0033
Uncategorized

उभाटा गटाच्या आराध्या दुबे प्रभाग क्रमांक १७ ब मधून निवडणूक मैदानात…

Bundelikhabar

महाराष्ट्र, कल्याण पूर्व, कल्याण डोंबिवली महानगरपालिका १५ जानेवारी २०२६ रोजी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांनी मतदारांचा हक्क हिरावून घेत, माघार घेतल्यामुळे महायुतीचे एकूण २० उमेदवार बिनविरोध झाले आहेत. मात्र आराध्या राजन दुबे यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर हार न मानता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मशाल या चिन्हावर लढण्याचा ठाम निर्णय घेऊन निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. उभाटा गटाच्या आराध्या राजन दुबे या उच्चशिक्षित असून दीप भारती वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने राजन दुबे हे गेली कित्येक वर्ष सामाजिक व राजकीय कार्यात कार्यरत आहेत,तसेच महिला विकासासाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांना राजकीय वारसा लाभला असल्यामुळे समाजकार्याची त्यांना आवड आहे. प्रभाग क्रमांक १७ ब चा विकास करण्यासाठी त्या पाय रोवून निवडणूक मैदानात उभ्या राहिल्या आहेत. पिसवली, टाटा पॉवर, अडीवली, गोलीवली, दावडी, तुकाराम चौक, हाजी मलंग रोड, काका ढाबा, नमस्कार ढाबा, अमरदीप कॉलनी, पाईपलाईन रोड, चेतना स्कूल,मधील

जनतेच्या अनेक समस्या पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल शाळांची समस्या महिलांना रोजगार अशा अनेक प्रश्नांना अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आराध्या राजन दुबे या मैदानात उतरले आहे. सरपंच नगरसेवक आले गेले मात्र विकासाची कामे जैसे थे आहेत पिसावलीती मराठी शाळेची भिंत पडलेली आहे मात्र ती शाळेची भिंत सुद्धा येथील सत्ताधाऱ्यांनी बांधलेले नाही. झोपडपट्ट्यांच्या असलेल्या समस्या पाण्याचे प्रश्न असतील पक्या रस्त्याचे प्रश्न असतील विकास झाला विकास झाला असे सांगून येथील भोळ्या भाबड्या जनतेचे राजकारण्यांनी आतापर्यंत फसवणूक केली आहे. मात्र कुठलाही विकास झालेला नसून जनता ही त्रासलेली आहे. पाणी सुद्धा दिवसाआड येत जनतेला आपले प्रश्न सोडवायचे असतील तर नवीन चेहऱ्याला संधी देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. जनतेने आम्हाला संधी दिल्यास आम्ही मूलभूत सुविधांसाठी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा मुलांसाठी शाळा याला म्हणजेच विकासाला प्राधान्य देऊ असे मत यावेळी बोलताना त्यांनी जाहीर केले.

 

@महाराष्ट्र प्रभारी राकेश चौबे (बैखौफ भारतीय)


Bundelikhabar

Related posts

थाना किशनगढ़ पुलिस ने ग्राम कुपी में घर से चोरी का किया खुलासा- 3 चोर गिरफ्तार

Bundeli Khabar

बिजवार में सोशल डिस्टेनसिंग की धज्जियां और ब्रिटेन में सोशल डिस्टेनसिंग के उलंघन में स्वास्थ्य मंत्री का स्तीफा

Bundeli Khabar

हटाये गए आईजी: शिकाारियों के साथ मुठभेड़ में तीन पुलिस कर्मी शहीद

Bundeli Khabar
error: Content is protected !!