25.8 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » काळा घोडा महोत्सवात बेस्ट उपक्रमाचे प्रदर्शन
महाराष्ट्र

काळा घोडा महोत्सवात बेस्ट उपक्रमाचे प्रदर्शन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील आबालवृद्धांचे आकर्षण असणाऱ्या काळा घोडा महोत्सवात यंदा बेस्ट उपक्रमाच्या ऐतिहासिक प्रगतीचे प्रदर्शन पहायला मिळणार आहे.
काळा घोडा महोत्सव समितीने बेस्टच्या महाव्यवस्थापकांना विनंती केल्यानुसार यावर्षीच्या महोत्सवात चर्चगेट जवळील आझाद क्रॉस मैदानात बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा आणि परिवहन सेवेच्या ऐतिहासिक जडणघडण आणि प्रगती बाबत निवडक वस्तुंचे प्रदर्शन ४/२/२०२३ पासून १२/२/२०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाहता येणार आहे.
काळा घोडा महोत्सवात प्रथमच दिसणऱ्या या प्रदर्शनाला तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
बेस्ट उपक्रमाच्या सुंदर अशा आणिक आगार येथील ऐतिहासिक म्युझियमला आपण विनामूल्य भेट देऊन आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद घेऊ शकता.
पत्ता- बेस्ट म्युझियम, प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, आणिक आगार, महानगर गॅस लिमिटेड समोर, मुंबई-४०००२२.
वेळ- सोमवार – सकाळी ७- दुपारी ३.३०
मंगळवार ते रविवार – सकाळी ९- सायंकाळी ५
दूरध्वनी- ७२०८९७११७२

Related posts

राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

Bundeli Khabar

राकापां में असंघठित कामगार विभाग के मुंबई अध्यक्ष नियुक्त हुए देवन शशि आचार्य (देवा अन्ना)

Bundeli Khabar

बिजली चोरी के मामले में तीन लोगों के खिलाफ शिकायत दर्ज

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!