21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना
महाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष असतील. या समितीत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सदस्य असतील.

याशिवाय या समितीमध्ये विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. याशिवाय डॉ.अनिल काकोडकर, डॉ.शशिकला वंजारी, वासुदेव कामत, ॲड. उज्ज्वल निकम आणि डॉ. जयंत नारळीकर हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. सदर समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.


Bundelikhabar

Related posts

अथर्व फाउंडेशनतर्फे ‘ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय’ चे रंगतदार प्रस्तुति

Bundeli Khabar

महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे – डॉ.मनीलाल शिंपी

Bundeli Khabar

आईटी मिनिस्टर अजीत पाल के कार्यक्रम में पत्रकार अरुण कमल हुए सम्मानित

Bundeli Khabar
error: Content is protected !!