25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे – डॉ.मनीलाल शिंपी
महाराष्ट्र

महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे – डॉ.मनीलाल शिंपी

महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे – डॉ.मनीलाल शिंपी
आर एस पी कमांडर मनीलाल शिंपी
यांचा औरंगाबाद येथे सन्मान!

किशोर पाटिल/महाराष्ट्र
भिवंडी : आर एस पी कमांडर ठाणे युनिट तथा ब्रँड ॲम्बेसेडर ओडिसा राज्य डॉ.श्री. मनीलाल रतीलाल शिंपी यांचा विशेष सन्मान शिंपी समाज आणि श्री स्वामी मच्छिंद्रनाथ अध्यात्म मंदिर मिटमिटा,औरंगाबाद यांच्या वतीने संभाजीनगर,औरंगाबाद येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.त्याच बरोबर दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री. किशोर पाटील,भिवंडी तालुक्यातील भोकरी गावचे समाज सेवक तथा प्रसिद्ध उद्योजक श्री. रामचंद्र शांताराम देसले, स्वामी नारायण ट्रस्ट कल्याणचे अध्यक्ष श्री. दिनेश भाई ठक्कर, ओबीसी एकता समता परिषदेचे अध्यक्ष प्रा.श्री. विनोद हनुमान पाटील , आर एस पी उपसमादेशक श्री.जितेंद्र भिमराव सोनवणे, आर एस पी अधिकारी श्री.घनश्याम किशोर सोनवणे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला।


सदर सन्मान हा संभाजीनगर,औरंगाबाद चे शिंपी समाजाचे जिल्हा अध्यक्ष श्री. सुधाकर विठ्ठल शिंपी,जिल्हा सचिव श्री.विजय नारायण कापुरे, श्री.सुनिल गागुर्डे शहर अध्यक्ष औरंगाबाद श्री मच्छिंद्रनाथ महाराज मंदिर ट्रस्ट चे संचालक श्री . विशुभाऊ, श्री.सुनिल शिंपी,औरंगाबाद शहर कार्याध्यक्ष,संतोष सोनवणे,बिपिन सोनवणे,उपमहाराष्ट्र केसरी श्री राजू लोणारे येवले नाशिक,यांच्या वतीने सदर सर्व सन्मानीय व्यक्तींचा सन्मान विवध ठिकाणी करण्यात आला।


जे का रंजळे गांजळे त्यासी म्हणे जो आपुले या उक्ती प्रमाणे आम्ही सर्व समाजाला घेऊन एकत्र येऊन ज्यांना खरोखरच गरज आहे अशा विविध जाती धर्माच्या गरीब गरजु नागरिकांना आधार म्हणून मदत करत आहोत।
आर एस पी चे महासमादेशक श्री अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आर एस पी युनिट ठाण्याच्या वतीने मी आवाहन करीत आहे. तसेच मी जरी शिंपी समाजाचा असलो तरी माझ्या समाजासाठी १०% व इतर सर्वांना ९०% मदत करण्याचा माझा मुख्य उद्देश आहे.म्हणून सर्व जाती भेद विसरून जसे आम्ही एकत्र आलो आहोत तसेच सर्वांसाठी समान हक्क देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या सहकार्याने करणार आहोत.संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत.व हीच जनसेवा यापुढेही कायम सुरू राहील ही सदिच्छा आर एस पी कमांडर डॉक्टर श्री मणिलाल शिंपी यांनी सत्कार समयी बोलताना व्यक्त केली।

Related posts

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

Bundeli Khabar

श्रमजीवी संघटनेच्या आदोलनच्या इशा-याची पोलिसांनी घेतली दखल

Bundeli Khabar

कोपर पुल का उद्घाटन मुख्यमंत्री के हाथों सम्पन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!