22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20221113 WA0059
महाराष्ट्र

अथर्व फाउंडेशनतर्फे ‘ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय’ चे रंगतदार प्रस्तुति

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

संतोष साहू,

मुंबई: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे अथर्व फाऊंडेशन आणि ऑल प्ले प्रॉडक्शनतर्फे ‘ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय’ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोरिवलीतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाटक, कविता आणि स्किट्सने मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रमुख पाहुणे गोपाळ शेट्टी (खासदार उत्तर मुंबई), सतींदर एस. आहुजा (जॉर्जियाचे काउंसिल), अरुण नलावडे, वर्षा राणे (ट्रस्टी अथर्व फाउंडेशन) आणि सुनील राणे (आमदार, बोरिवली) उपस्थित होते.
ऑल प्ले कार्निव्हलमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी बोरिवलीतील विविध शाळांमधील मुलांनी केलेली विविध स्किट्स, बॉलीवूड गाणी आणि कविता सादरीकरणाला दाद दिली. शिवाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित नाट्यमय सादरीकरण आणि श्रीमती वर्षा राणे दिग्दर्शित द्वारका प्रसाद माहेश्वरी लिखित ‘वीर तुम बढ़े चलो’ या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.
यावेळी बोलताना सुनील राणे म्हणाले की, अथर्व फाऊंडेशनने आयोजित केलेला ऑल प्ले कार्निव्हल हा बोरिवलीतील स्थानिक लोकांसाठी आजूबाजूच्या मुलांसमोर त्यांचे कलागुण दाखविण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. मुलांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणाने पाहुणे आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


Bundelikhabar

Related posts

कैंसर पीडित पूर्व छात्र ने चिकित्सा शिक्षा में जीता स्वर्ण पदक

Bundeli Khabar

विद्या चव्हाण तसेच निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी राज्यपाल मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य आणि बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!