22.8 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20221112 WA0011
महाराष्ट्र

मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ व्यासंगी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. दोन लाख रूपये रोख, मानपत्र, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे २५ नोव्हेंबरला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला क्रीडा या क्षेत्रात भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस देण्यात येतो. २०२१ मध्ये हा पुरस्कार कोरोना काळात संपूर्ण देशासह जगभर कोरोना लस पुरविणाऱ्या पुण्यातील सायसर पुनावाला यांच्या सिरम कंपनीस दिला आहे. यंदा तो मधु मंगेश कणिक यांना देण्यात येणार आहे.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन करून मोलाची भर घातली आहे. त्यांच्या लेखन कलेचा विस्तार आणि आवाका लक्षात घेऊन तसेच मराठी साहित्यात केलेल्या बहुविध योगदानाची गौरवपूर्ण नोंद घेऊन सन २०२२ चा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार कर्णिक यांना देण्यात येत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

कर्णिक यांनी १९९० साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. २००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव, जनस्थान आदी पुरस्कारांसह कर्णिक यांना उल्लेखनीय असे ३० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.


Bundelikhabar

Related posts

दयानंद चोरघे यांच्या कार्यकर्ता संपर्क अभियानाला शहापूर मध्ये उस्फुर्त प्रतिसाद

Bundeli Khabar

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ गुणवंतांना प्रदान

Bundeli Khabar

एन.के.जी.एस.बी. निवडणूकीत आशीर्वाद पॅनलला मराठा समाजाचा पाठिंबा

Bundeli Khabar
error: Content is protected !!