22.8 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210909 WA00312
महाराष्ट्र

खासदार संजय राऊत यांनी केले पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक

Bundelikhabar

खासदार संजय राऊत यांनी केले पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक!
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला कार्य अहवाल सादर.

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : कोरोना महामारीमूळे वृत्तपत्र व पत्रकारां समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रादेशिक व जिल्हा दैनिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून शासनाकडे दैनिकांची थकबाकी आहे.राज्य पत्रकार संघाच्यावतीने संबंधित विभागाकडे पाठपुरावा सूरू आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष्य घालावे यासाठी महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार म्हणून बोलावे असे,साकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा संपादक,शिवसेना नेते खा.संजय राऊत यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी घातले. राज्यशासनाकडे पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उपक्रम कार्याचा अहवाल संजय राऊत यांच्याकडे सादर केला. कोरोनामुळे वृत्तपत्र आणि पत्रकारांन समोर निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत वसंत मुंडे यांनी सविस्तर माहीती त्यांना दिली. कोरोना काळात महाराष्ट्रातील 28 जिल्हय़ातील पत्रकार,संपादक व व्यवस्थापकांसोबत आनलाईन संवाद,महाराष्ट्रातील संपादकांची पहिली गोलमेज परिषद, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाने एकाच दिवशी राज्यभर रक्तदान शिबिर घेऊन तब्बल चौदाशे पिशवी रक्त संकलन केले होते, याबद्दल संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रत पत्रकारांनीही इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्त दिले, हे पहिल्यांदाच घडले ,अशी मिश्किल टिपणी करत, पत्रकारांच्या विधायक उपक्रमाचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले.


Bundelikhabar

Related posts

शहापूर येथे विधी सेवा आणि शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न

Bundeli Khabar

छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार से सम्मानित हुए क़ासिम हैदर क़ासिम

Bundeli Khabar

आरोग्य समस्या व निराकरण या विषयावर चर्चासत्र

Bundeli Khabar
error: Content is protected !!