29.6 C
Madhya Pradesh
July 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20221110 WA0010
महाराष्ट्र

विद्या चव्हाण तसेच निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी राज्यपाल मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई : अब्दुल सत्तार यांनी एका प्रशासकीय अधिकाऱ्याला “दारु पितोस कारे” त्याचप्रमाणे आपल्या सचिवाला अत्यंत अर्वाच्य भाषेत “कुत्रा” म्हणून त्यांनी संबोधिले आणि आता तर अंत्यत सुसंकृत असलेल्या संसदरत्न खासदार सुप्रीयाताई सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरला याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये व संपूर्ण महाराष्ट्रात अंत्यत नाराजी आहे. आपण त्यांना माफी मागायला सांगीतली असताना सुद्धा त्यांनी माफी मागीतली नाही उलट वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातुन पुन्हा पुन्हा तोच अपशब्द वापरला आहे. तसेच २४ तास होऊन गेले तरी त्यांच्या वागणुकीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. म्हणून आपल्या या उर्मट, उच्चट आणि महिलांविषयी कुठलाही आदर नसणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्री पदाच्या खुर्चीवर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. तरी त्यांची ताबडतोब मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्रातील तमाम महिला या निवडणुकामध्ये आपल्या अनेक आमदारांना हरवण्यासाठी कटीबध्द असेल. तसेच हा महाराष्ट्र ज्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले त्या जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा चाँद बींचा महाराष्ट्र आहे. अंत्यत सुसंकृत आणि महिलांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राची परंपरा, सत्तेमध्ये कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी असले तरी महिलांचा सन्मान बाळगणे हे बंधनकारक आहे. तरी अब्दुल सत्तारांची त्वरीत हकालपट्टी करावी. अशा मागणीचं पत्रं राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले. त्यावेळी मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी शिष्टमंडळात सहभागी होत्या.

विद्या चव्हाण यांनी निवेदनात पुढे असेही म्हंटले आहे की, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुध्दा अशीच मुक्ताफळे उधळलेली आहेत. गुलाबराव पाटलांनी आपल्या जाहीर भाषणातून सुषमाताई अंधारे यांच्या विषयी टिका केलेली आहे. टिका आम्ही समजू शकतो, परंतु सिनेमातील नटी असा उल्लेख करणे हे सुध्दा अपमानास्पद आहे. गुलाबराव पाटलांची ही वागणुक अंत्यत उर्मट व उध्दट असून महिलांच्या भावनांना ठेच पोहचवणारी आहे.

तसेच मंत्री रविद्र चव्हाण यांनी भाजपाचे पदाधिकारी कल्याण जिल्हाध्यक्ष संदीप माळी याने एका १४ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करुन हा जेलमध्ये होता, त्याने मारामारी, गुंडागर्दी करून एका केबल चालकाला मारहाण करून त्रास दिला त्या त्रासापोटी त्या केबल चालकाने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली असुन रेल्वे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हापण नोदविला आहे. अश्याप्रकारे कल्याण मध्ये संदीप माळी दहशत निर्माण केली. अश्या या गुन्हेगार प्रवृत्तीच्या बलात्कारी, खुनी गुन्हेगाराला वाचवण्याचे काम मंत्री रवींद्र चव्हाण हे करीत आहेत. काल दिनांक ७/११/२२ रोजी भायखळा येथील पोलिस अधिकार्‍यांसोबत २ तास बसुन हे मंत्री महोदय रवींद्र चव्हाण त्या पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणून संदीप माळीच्या प्रकरणामध्ये सेक्शन बदलुन त्याला कोर्टामध्ये शिक्षा होणार नाही, अश्याप्रकारे पोलिसांवर दबाव आणण्याचे काम करीत होते. त्याचवेळी केबल चालकाची पत्नी व बलात्कार केलेल्या मुलीची आई संदीप माळीला अटक का करत नाही, याची विचारणा करत असताना सदर मंत्री रवींद्र चव्हाण, संदीप माळीला मदत करण्यात पोलिस ठाण्यामध्ये व्यग्र होते. गुन्हेगारांना वाचवणारे मंत्री पदाच्या खुर्चीवर बसतात कसे ?

तरी महिलांचा अपमान करणार्‍या, अत्याचार करणार्‍या तिन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन मंत्री पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी, अन्यथा आपल्याला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. पुढील काळात याची मोठी किमंत आपल्याला मोजावी लागेल. आज भलेही पोलिस संरक्षणामध्ये असाल परंतु उद्या जनतेसमोर जावेच लागणार आहे. तरी वेळीच खबरदारी उपाययोजना म्हणून वाईट प्रवृत्तीच्या लोकांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणूनच नव्हे तर शिवसेना, काँग्रेस ह्या “महाआघाडीच्या” कार्यकर्त्यांनी या अन्याय, अत्याचारी मंत्र्याची हकालपट्टी केली नाही तर एकत्रीतपणे या विरुध्द लढायचे ठरवले आहे. असा सज्जड इशाराही दिला आहे.


Bundelikhabar

Related posts

योडा आणि अनिल अग्रवाल फाऊंडेशनतर्फे १०,००० बेघर पशु जनावरां साठी भव्य भोजन योजना

Bundeli Khabar

शिवसेनेचा पद वितरण सोहळा संपन्न

Bundeli Khabar

६१व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गिरगाव केंद्रातून ‘नात्याची गोष्ट’ प्रथम

Bundeli Khabar
error: Content is protected !!