30.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220117 WA0001
महाराष्ट्र

शिवसेनेचा पद वितरण सोहळा संपन्न

Bundelikhabar

भिवंडी : भिवंडी शहरात शिवसेनेने अतिशय नियोजनबद्धरित्या, कोणताही गाजावाजा न करता रणणिती आखून पक्षाची वाटचाल सुरूच ठेवली असून भिवंडी महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. आज रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, अजयनगर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा.पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सर्व नियम पाळून दोन टप्प्यात कार्यक्रम आखून तब्बल ७० शिवसैनिकांना पद नियुक्ती नुसार जबाबदारी देण्यात आली आहे. मा.शहरप्रमुख सुभाष माने साहेब यांच्या हस्ते पद वितरण कार्यक्रम पार पडला. शिवसेनेने गतवेळेची मरगळ झटकुन पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरवात केली आहे. पक्ष बांधणी आणि भिवंडी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मिशन-२०२२ ची आखणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून भिवंडी शहरातील प्रत्येक गल्ली, बोळ, मोहल्ल्यात शिवसैनिकांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज उपशहरप्रमुख मनोज पाटील, आणि श्रीनाथ पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील कामतघर, नवी वस्ती, शास्त्रीनगर या विभागात शिवसैनिकांना पदे वितरीत करण्यात आली.

दक्षिण भारतीय समाज सेल, मारवाडी समाज सेल, महिला आघाडी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आणि गटप्रमुख अशा तब्बल ७० शिवसैनिकांना दोन टप्प्यात कार्यक्रम ठेवून पद वितरीत करण्यात आले. भिवंडी विधानसभा पश्चिम संघटिका म्हणून श्रीमती अर्चना अरुण नागले यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तसेच महिला आघाडी शहर सचिव म्हणून अनुराधा कल्याणम तर इतर महिला पदाधिकाऱ्यांना पद वितरीत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शहरप्रमुख सुभाष माने साहेब यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावर महानगरप्रमुख श्याम पाटील, शहर सचिव महेंद्र कुंभारे, विधानसभा संघटक दिलीप नाईक (पूर्व), मदन भोई (पश्चिम), विधानसभा (पूर्व) सचिव दिलीप कोंडलेकर, भिवंडी विधानसभा संघटिका (पूर्व) श्रीमती कोमल पाटील, उपशहरप्रमुख श्रीनाथ पाटील, उमेश कोंडलेकर, विरेंद्र पाटील यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती!


Bundelikhabar

Related posts

मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात केले ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण

Bundeli Khabar

ज्येष्ठांच्या स्वप्नांचा चुराडा झाला

Bundeli Khabar

अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना घोषित करून अनुदान द्यावे ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी

Bundeli Khabar
error: Content is protected !!