22.8 C
Madhya Pradesh
September 1, 2026
Bundeli Khabar
IMG 20221216 WA0053
महाराष्ट्र

६१व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गिरगाव केंद्रातून ‘नात्याची गोष्ट’ प्रथम

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गिरगाव केंद्रातून चारकोप कल्चरल अँड स्पोर्टस फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘नात्याची गोष्ट’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बेस्ट कला व क्रीडा मंडळ, मुंबई या संस्थेच्या ‘र्‍हासपर्व’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे गिरगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे –

सदभावना, मुंबई या संस्थेच्या ‘माझं घर’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक निलेश गोपनारायण (नाटक – नात्याची गोष्ट), द्वितीय पारितोषिक गणेश मिंडे (नाटक र्‍हासपर्व), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक कैलास ठाकूर (नाटक – गणपति वप्प मोरयं), द्वितीय पारितोषिक प्रशांत सावंत (नाटक – र्‍हासपर्व), नेपथ्य प्रथम पारितोषिक नंदकुमार सावंत (नाटक – र्‍हासपर्व), द्वितीय पारितोषिक सुधीर ठाकूर (नाटक – वर्तुळ), रंगभूषा : प्रथम पारितोषिक सुनील ताम्हणकर (नाटक – र्‍हासपर्व), द्वितीय पारितोषिक उदयराज तांगडी (नाटक – गणपती वप्प मोरयं), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक निलेश गोपनारायण (नाटक – नात्याची गोष्ट) व प्रियांका जाधव – ठोकळे (नाटक – माझं घर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे गौरी मोहाडीकर (नाटक – घायाळ), जान्हवी दरेकर (नाटक – उत्तरोपनिषद), दिपाली शहाणे (नाटक – नात्याची गोष्ट), भावना रहाटे (नाटक – क्षुधाग्नि), मेघा पाथरे (नाटक – र्‍हासपर्व), मंचल दर्णे (नाटक – माझं घर), आदित गंगाखेडकर (नाटक – मित्राची गोष्ट), सुरेश जाधव (नाटक – पद्मिनी), सचिन म्हात्रे (नाटक – र्‍हासपर्व), अविनाश बाबर (नाटक – वर्तुळ)

दिनांक १५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री श्रीपाद जोशी, किरण येवलेकर आणि मिलिंद दांडेकर यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.


Bundelikhabar

Related posts

बरखा नांगिया ने यास्मीन मिस्त्री और सौम्या बनर्जी को मिसेज वर्ल्ड इंटरनेशनल 2022 का पहनाया ताज

Bundeli Khabar

शवविच्छेदन कक्ष २४ तास सेवा देणार

Bundeli Khabar

सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Bundeli Khabar
error: Content is protected !!