28.9 C
Madhya Pradesh
May 6, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य आणि बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य आणि बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य व १७ आणि १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य (मुंबई प्रभादेवी, गिरगांव, घाटकोपर, वाशी, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, मालवण, गोवा केंद्रात आयोजित केलेल्या) स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ६:३० वा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी २२९ विजेत्या स्पर्धक रंगकर्मींना सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक अरुण नलावडे, अभिनेते दिग्दर्शक कादंबरीकार अशोक समेळ, जागतिक कीर्तीचे वेशभूषाकार प्रकाश निमकर, जेष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते, अभिनेते प्रमोद पवार, मीना नाईक, जेष्ठ रंगकर्मी सुभाष भागवत, जेष्ठ रंगकर्मी अरुण भडसावळे, दिग्दर्शक हेमंत भालेकर, जेष्ठ रंगकर्मी वासूदेवजी विष्णूपुरीकर, लेखक दिग्दशर्क डॉ. अनिलजी बांदिवडेकर, प्रकाश योजनाकार सुनील देवळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. करोना नंतरचा नाट्य स्पर्धेचा हा पहिलाच पारितोषिक वितरण समारंभ असल्याने रंगकर्मी मध्ये खूप उत्साहाचे वातावरण होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पारंपारिक पद्धतीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रशांत लोके लिखित व मंगेश सातपुते दिग्दर्शित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अमेय रानडे आणि अभिनेत्री संजना पाटील तसेच संयोजन व समन्वयन कामाक्षी क्रिएटीव्ह यांनी केले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

Related posts

ठाणे जिल्ह्याचे लोकनेते सन्माननीय श्री. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Bundeli Khabar

युवा महिलाओं के लिए प्रेरणा बन गई खुशबू सांघवी

Bundeli Khabar

प्रहार जनशक्ति पक्ष का रिमोट कंट्रोल ठाणे में

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!