23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजी लटकेंचा विजय निश्चित
महाराष्ट्र

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजी लटकेंचा विजय निश्चित

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्रानंतर भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून यासंदर्भात घोषणा केली. त्यानंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेणार आहेत.

भाजपकडून उमदेवार बाहेर पडला तरी निवडणूक होणार आहे. कारण उमेदवारांची छाननी झाल्यानंतर आता १४ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मुरजी पटेल (भाजप), राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पक्ष), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पक्ष- पीपल्स), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पक्ष), अपक्ष चंदन चतुर्वेदी, चंद्रकांत रंभाजी मोटे, निकोलस अल्मेडा, नीना खेडेकर, पहलसिंग धनसिंग आऊजी, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे, राजेश त्रिपाठी आणि शकिब जाफर ईमाम मलिक या १४ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत आहे. १७ तारखेपर्यंत भाजपच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर ऋतुजा लटके यांचा विजय सोपा होईल, पण आणखी १२ जण रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

*या सगळ्याला राजकीय वास – नाना पटोले*

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकाच दिवशी केलेल्या आवाहनाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. या सगळ्याला राजकीय वास येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही खजिन्याच्या चावीची निवडणूक आहे. एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेले राजकारण सध्या राज्यातील आणि देशातील लोक पाहत आहेत. आतापर्यंत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी, कोणता विरोध होता, ते माहिती नाही. पण काल राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकदम अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या सगळ्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील राजकारण कारणीभूत आहे का, असा वास येत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होत आहे. यामध्ये एमसीएचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याची सर्वात जास्त उत्सुकता आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि क्रिकेटपटू संदीप पाटील हे दोघेजण अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. सुरुवातीला शरद पवार हे संदीप पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. परंतु, काही दिवसांपूर्वी अचानक राजकीय सूत्रं फिरली आणि शरद पवार यांच्या पॅनलने ऐनवेळी आपली ताकद आशिष शेलार यांच्या पाठिशी उभी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्यही व्यक्त करण्यात आले होते.

शरद पवार यांनी यापूर्वी मुंबईपासून ते आयसीसीपर्यंत सर्वच संघटनांची अध्यक्षपदं भूषवली आहेत. पण वयाच्या नियमामुळे त्यांना आता एमसीएची निवडणूक लढवता येणार नाही. शरद पवार हे सुरुवातील संदीप पाटील यांना एमसीएचे अध्यक्षपद मिळण्यासाठी अनुकूल होते. परंतु, अध्यक्ष झाल्यानंतर संदीप पाटील हे शरद पवार यांच्या सूचना कितपत ऐकतील, ही शंका आहे. त्यामुळे आशिष शेलार हे शरद पवार यांना अधिक जवळचे वाटले असावेत. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी आशिष शेलार आणि शरद पवार यांची युती झाल्याची चर्चा आहे. एमसीएची हीच निवडणूक आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव टाकताना दिसत आहे.

Related posts

काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Bundeli Khabar

नहीं रहे रावण ‘अरविंद त्रिवेदी’

Bundeli Khabar

महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचा चंद्रपूर दौरा संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!