38.7 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » हिंदवी स्वराज्याचे हिरोजी इंदुलकर यांना जागतिक वास्तुविशारद दिन समर्पि
महाराष्ट्र

हिंदवी स्वराज्याचे हिरोजी इंदुलकर यांना जागतिक वास्तुविशारद दिन समर्पि

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याचे अजोड बांधकाम केलेल्या हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीस यंदाचा जागतिक वास्तुविशारद दिन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके आर्टिकेक्ट कॉलेजच्या वतीने समर्पित करण्यात आला. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी या दिनाचे जगभरात आयोजन करण्यात येते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ वास्तुविशारद सर्वश्री चंद्रशेखर प्रभू, विनायक नाबर, रघुनाथ तुपे, मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक पालिका आयुक्त श्री. चक्रपाणी, वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संकुल संचालक प्रा. अशोक चव्हाण, प्राचार्य अमोल बापट, रोजगार व प्रशिक्षण विभागाचे संचालक स्वप्नील देसाई आदी मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बांधकाम क्षेत्रातील जागतिक प्रकल्पांच्या प्रतिकृती प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. वर्षभरात महाविद्यालयीन तसेच आंतरमहाविद्यालयीन पातळ्यांवरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
प्रा. अशोक चव्हाण यांनी हिरोजी इंदुलकर यांच्या कार्याचा गौरव करत रायगड किल्ल्याचे बांधकाम तंत्र प्रतिकूल परिस्थितीत प्रत्यक्षात साकारणे, हे त्या काळात फार मोठे आव्हान होते. आपल्याच भोवताली असलेल्या आणि परंपरा असलेल्या वास्तुशास्त्राचा आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच इथे शिकून इथल्याच समाजासाठी कार्य करण्याची भावना बाळगा, आपला देश अधिक समृद्ध करा, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी जगण्याच्या निकषांना समजून घेऊन आपल्या कृतीनुसार कार्य केले पाहिजे, असे विचार विनायक नाबर यांनी व्यक्त केले तर आर्किटेक्ट विद्यार्थ्यांना भविष्यात राष्ट्रबांधणी करण्याची संधी मिळत असते, हे त्यांनी ध्यानात ठेवून आपले भवितव्य घडवावे, असे आवाहन रघुनाथ तुपे यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला तसेच विजेत्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका आव्हाड यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रदीप माने यांनी मानले.

Related posts

प्रसिद्ध अभिनेता डॉ. गिरीश ओक बने ओजामिन के नए ब्रांड एंबेसडर

Bundeli Khabar

लस वाहिके मुळे भिवंडी ग्रामीण भागात कोविड लसीकरणाचा वेग वाढेल – सभापती नमिता गुरव

Bundeli Khabar

ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी तारक की मारक

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!